
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा मोबाईलवर रमी खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं आहे. या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. चार मंत्री नक्की घरी जाणार, महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील! असा दावा राऊत यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
‘फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी! मी दिल्लीत आहे; चार मंत्री नक्की घरी जात आहेत; पाचवा गटांगळ्या खात आहे. मिंधे अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला! महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील!’ असं ट्विट राऊत यांनी केलं आहे, त्यांनी यासोबतच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा तो व्हिडीओ देखील शेअर केला आहे. राऊत यांच्या या ट्विटमुळे चर्चेला उधाण आलं आहे.
फडणवीस मंत्रिमंडळात रम रमी रमा रमणी!
मी दिल्लीत आहे;
चार मंत्री नक्की घरी जात आहेत;
पाचवा गटांगळ्या खात आहे.
मिंधे अजित दादांचे मुख्य नेते अमित शहा यांनी निर्णय घेतला!
महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील!
@AmitShah
@PMOIndia
@Dev_Fadnavis pic.twitter.com/C0rZ0fI6aE— Sanjay Raut (@rautsanjay61) July 20, 2025
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे हे कायमच चर्चेत असतात आता ते पुन्हा एकदा चर्चेमध्ये आले आहेत, त्यांचा विधानसभेच्या सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या कोंडीचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हिडीओ ट्विट केला आहे.
सोबतच यावरून त्यांनी सरकार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला देखील डिवचलं आहे. सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही, भाजप निर्णय घेत असल्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना काही काम शिल्लक राहिलेलं नाही आणि त्यामुळेच कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना सभागृहात बसून रम्मी खेळण्याची वेळ आली असावी, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान त्यानंतर आता संजय राऊत यांनी देखील एक ट्विट केलं आहे, त्या ट्विटमध्ये त्यांनी मोठा दावा केला आहे. चार मंत्री नक्की घरी जाणार, महाराष्ट्रात वेगवान घडामोडी लवकरच सुरू होतील! असा दावा राऊत यांनी केला आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.