NCP : आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार, राष्ट्रवादीचा इशारा काय?

शिवसेनेत जी बंडाळी झाली त्याला खतपाणी भाजपने घातले, हे सर्व महाराष्ट्र पहात आहे. आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शिलेदारांसह पुन्हा मैदानात उतरली. येणाऱ्या निवडणुकीत भाजपविरोधात मविआचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी बांधला असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले.

NCP : आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार, राष्ट्रवादीचा इशारा काय?
महेश तपासे
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 4:37 PM

मुंबई : शिवसेनेत (Shiv Sena) बंड घडवून महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे पाप भाजपने केले. हे महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) नेते, कार्यकर्ते व पदाधिकारी कधीच विसरणार नाही, हे सांगतानाच आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसमोर एक आव्हान म्हणून उभी राहणार आहे. असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिला आहे. आज शरद पवार यांची राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी भेट घेतली. त्यानंतर या भेटीबाबत महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी माहिती देताना भाजपला हे उघड आव्हान दिले आहे. भाजपची सत्ता येताच राष्ट्रवादी काँग्रेस एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करताना पहायला मिळेल, असा विश्वासही महेश तपासे यांनी यावेळी व्यक्त केला.

शरद पवारांनी केले मार्गदर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार मुंबईत असल्याने त्यांनी आज शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत शरद पवार यांनी मविआ सरकार पाडण्यासाठी झालेल्या घडामोडी आणि येत्या काळात कशापद्धतीने भाजप विरोधात लढा द्यायचा याचे सविस्तर मार्गदर्शन केले. अडीच वर्ष महाविकास आघाडीचे सरकार होते. या सरकारला पवार यांनी योग्य मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निधीचे वाटप समान करताना राज्याची आर्थिक घडी विस्कटणार नाही, याची काळजी घेतली असेही महेश तपासे म्हणाले.

बंडाळीला भाजपने खतपाणी घातले

शिवसेनेत जी बंडाळी झाली त्याला खतपाणी भाजपने घातले, हे सर्व महाराष्ट्र पहात आहे. आजपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आपल्या शिलेदारांसह पुन्हा मैदानात उतरली. येणाऱ्या निवडणुकीत भाजपविरोधात मविआचेच उमेदवार निवडून आणण्याचा चंग नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी व पदाधिकार्‍यांनी बांधला असल्याचे महेश तपासे यांनी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे गटाला खतपाणी घालण्याचं काम भाजपनं केलंय. हे शरद पवार यांनी आधीच स्पष्ट केलं होतं. आता भाजपसोबत शिवसेनेचे बंडखोर सत्ता स्थापन्याचा दावा करणार आहेत. त्यामुळं विरोधी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल, असा विश्वास महेश तपासे यांनी व्यक्त केला.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?
प्रकाश आंबेडकर यांची 'मविआ'शी फारकत... जरांगे पाटील यांच्यासोबत आघाडी?.