इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक, 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

| Updated on: Nov 10, 2021 | 3:54 PM

पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारे असेच आहेत. त्यातच घरगुती गॅसचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केलीय. 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान विविध आंदोलनं करणार असल्याचं पटोले यांनी जाहीर केलंय.

इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पुन्हा आक्रमक, 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा
नाना पटोले, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरात काही प्रमाणात घट केली असली तरी पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वसामान्यांना न परवडणारेच आहेत. त्यातच घरगुती गॅसचे दरही प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारविरोधात आंदोलनाची घोषणा केलीय. 14 ते 19 नोव्हेंबर दरम्यान विविध आंदोलनं करणार असल्याचं पटोले यांनी जाहीर केलंय. (State-wide agitation against central government over fuel price hike, announcement by Nana Patole)

महागाई, पेट्रोल-डिझेल दरवाढ आणि सर्वसामान्यांना आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणाऱ्या धोरणांविरोधात महाराष्ट्र काँग्रेसनं केंद्र सरकारविरोधात राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. 14 ते 19 नोव्हेंबर या कालावधीत विविध आंदोलनं करणार असल्याची घोषणा पटोले यांनी केली आहे.

काँग्रेसचे जन-जागरण अभियान

महागाई आणि इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसं जनजागरण अभियानाची घोषणा केलीय. जन जागरण अभियान म्हणून देश वाचवण्याचं आवाहन आहे. महागाई, बेरोजगारी आणि भाजपनिर्मित बरबादीच्या विरुद्ध आवाज बुलंद करण्याची घोषणा आहे. आपणही या, आमच्या जन जागरण अभियानाशी जोडले जा आणि देश वाचवा, असं आवाहन काँग्रेसकडून करण्यात आलं आहे.

जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचा आजचा भाव

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. इंधनाचे दर स्थिर आहेत. IOCL ने बुधवारी पेट्रोल डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. सलग चौथ्या दिवशी इंधनाच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांना तात्पुरता का होईना पण दिलासा मिळाला आहे.

पेट्रोलियम कंपन्यांनी बुधवारी सकाळी जाहीर केलेल्या दरांनुसार, दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.01 रुपये आणि डिझेलची किंमत 86.71 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 109.96 आणि 94.13 रुपये प्रतिलीटर इतका आहे.

इतर बातम्या :

किरीट सोमय्यांमुळे अनिल परब पळून गेले तर आम्हाला न्याय कोण देणार? प्रवीण दरेकरांची घणाघाती टीका

निर्णय होत नाही, तोपर्यंत मुंबई सोडणार नाही, राज्यातल्या एसटी कर्मचाऱ्यांना लेकरा बाळांसह मुंबई गाठण्याचं आवाहन