Gadchiroli | गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा एकनाथ शिंदेंकडे

| Updated on: Jul 24, 2020 | 8:22 AM

कोरोनाच्या संकटामुळे 15 एप्रिल रोजी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची तात्पुरती अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती

Gadchiroli | गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा एकनाथ शिंदेंकडे
Follow us on

गडचिरोली : गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी पुन्हा एकदा शिवसेना नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर शासन निर्णयामध्ये तीन महिन्यांपूर्वी अंशत: बदल करण्यात आला होता. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात आली होती. (Gadchiroli Guardian Minister Eknath Shinde again)

कोरोनाच्या संकटामुळे 15 एप्रिल रोजी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्याकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रिपदाची तात्पुरती अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली होती. परंतु एकनाथ शिंदे आता पुन्हा पूर्वीप्रमाणे गडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची धुरा सांभाळतील. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात पत्र प्रसिद्ध केले आहे.

विजय वडेट्टीवार हे चंद्रपूरचे पालकमंत्री म्हणून कायम राहतील. तर एकनाथ शिंदे हे गडचिरोली व्यतिरिक्त ठाण्याचे पालकमंत्री आहेत.

विजय वडेट्टीवारांकडे मदत आणि पुनर्वसन तसेच बहुजन कल्याण खात्याची धुरा आहे. वडेट्टीवार हे चंद्रपूरमधून आमदार आहेत. त्या जिल्ह्याचं पालकत्वही त्यांच्याकडे आहे.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

कॉंग्रेस नेते विश्वजीत कदम यांच्याकडे असलेल्या भंडाऱ्याच्या पालकमंत्रिपदाचा पदभारही त्यावेळी कॉंग्रेस मंत्री सुनील केदार यांना देण्यात आला होता. (Gadchiroli Guardian Minister Eknath Shinde again)

दरम्यान, सोलापूरचे पालकमंत्रीही गेल्या काही महिन्यात तीन वेळा बदलले आहेत. सोलापूरचा भार राष्ट्रवादीचे मंत्री दिलीप वळसे-पाटलांकडून काढून आधी राष्ट्रवादीचेच मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्याकडे देण्यात आला होता. त्यानंतर तो पुन्हा राष्ट्रवादीचेच नेते दत्तात्रय भरणे यांच्याकडे सोपवण्यात आला.

संबंधित बातमी :

दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री तात्पुरते बदलले, कॉंग्रेसच्या ‘या’ मंत्र्यांना जबाबदारी

सोलापूरच्या पालकमंत्रिपदावरुन वळसे पाटलांची उचलबांगडी, जितेंद्र आव्हाडांना जबाबदारी

(Gadchiroli Guardian Minister Eknath Shinde again)