Special Trains: चाकरमान्यांचं टेन्शन दूर! गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळापाठोपाठ रेल्वेच्याही स्पेशल ट्रेन! कुठे कुठे ट्रेन थांबेल वाचा …

एसटी महामंडळाकडून गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांची सोय करण्यात आलीये आता यापाठोपाठ रेल्वेने सुद्धा चाकरमान्यांचं टेन्शन कमी केलंय.

Special Trains: चाकरमान्यांचं टेन्शन दूर! गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळापाठोपाठ रेल्वेच्याही स्पेशल ट्रेन! कुठे कुठे ट्रेन थांबेल वाचा ...
रेल्वेच्याही स्पेशल ट्रेन, ट्रेन कुठे कुठे थांबेल वाचा ...Image Credit source: ट्विटर - @KonkanRailway
Follow us
| Updated on: Jul 03, 2022 | 12:39 PM

मुंबई: गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलाय. कोकण आणि गणेशोत्सवाचं एक खास नातं आहे. गणेशोत्सवात मुंबई ते कोकण असा प्रवास करणारे नोकरवर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. एसटी महामंडळाकडून (ST Mahamandal) गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांची सोय करण्यात आलीये आता यापाठोपाठ रेल्वेने सुद्धा चाकरमान्यांचं टेन्शन कमी केलंय. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळापाठोपाठ मध्य रेल्वेने 74 स्पेशल ट्रेन चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या ट्रेन जर कमी पडल्या तर मध्य रेल्वेने (Central Railway) आणखी जादा गाड्या सोडण्याची तयारी ठेवली आहे.

  • ट्रेन क्र. 01137 : सीएसएमटी- सावंतवाडी दैनिक विशेष ट्रेन (44 फेऱ्या) ही ट्रेन 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान रोज मध्यरात्री 12.20 वा. सीएसएमटीहून सुटून दु. 2 वा. सावंतवाडीला पोहोचेल.
  • ट्रेन क्र.01138 : ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 21 ऑगस्ट ते 11 सप्टेंबरदरम्यान रोज सावंतवाडी रोड हून दु. 2.40 वा. सुटून पहाटे 3.44 वा. सीएसएमटीला पोहोचेल.
  • थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, पोहोचेल. कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
  1. ट्रेन क्र.01143: पनवेल- थिविम / कुडाळ विशेष ट्रेन (6 फेऱ्या) ही ट्रेन 28 ऑगस्ट, 4 आणि 11 सप्टेंबर रोजी पहाटे पनवेलहून 5 वा. सुटून दु. 2 वा. कुडाळला पोहोचेल.
  2. हे सुद्धा वाचा
  3. ट्रेन क्र.01144: ही परतीच्या प्रवासाची ट्रेन 27 ऑगस्ट, 3 व 10 सप्टेंबर रोजी दु. 2.40 वा. कुडाळहून सुटून पनवेलला मध्यरात्री 2.45 वा. पोहचेल
  4. थांबे : रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड.

 जादा गाड्या सोडण्याची तयारी

कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्या चार महिन्यांपूर्वीच फुल्ल झाल्याने या जादा फेऱ्यांचा समावेश केल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच मध्य रेल्वेने आणखी जादा गाड्या सोडण्याची तयारी ठेवली आहे. याशिवाय नागपूर- मडगाव द्विसाप्ताहिक विशेष (१२ फेऱ्या), पुणे कुडाळ विशेष (6 फेन्या) आणि पुणे – थिविम/कुडाळ विशेष ट्रेनच्या 6 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण स्पेशल चार्ज लावून सोमवार, 4 जुलैपासून सुरू होणार आहे. तसेच संगणकीय आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरूनही तिकिटांचे आरक्षण सुरू होणार आहे.

एवढ्या मोठ्या ‘वेटिंग लिस्ट’ची गरज आहे?

विशेष गाड्यांची गरज होतीच, पण चार महिन्यांपूर्वी नियमित गाडया फुल्ल झाल्या आहेत. एका सेकंदात आरक्षण फुल्ल होते. मग भल्यामोठ्या वेटिंगचे तिकीट हाती पडते. एवढी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ देण्याची गरज काय आहे? हा प्रश्न रेल्वे व्यवस्थापनाने आधी मार्गी लावायला हवा असं नागरिक म्हणणं आहे.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.