Sanjay Raut : रोज ऊठा हल्ला करा, बेडरपणे हल्ला करा, केवळ राऊत, सावंत बोलून चालणार नाही; राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन

| Updated on: May 08, 2022 | 4:18 PM

'मी रोज सकाळी बोलतो, माझा नाईलाज आहे,' असंं म्हणत शिवसेनेकडे माध्यमांवर बोलणारं युवा नेतृत्व नसल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मान्य केल्याचं बोललं जातंय.

Sanjay Raut : रोज ऊठा हल्ला करा, बेडरपणे हल्ला करा, केवळ राऊत, सावंत बोलून चालणार नाही; राऊतांचं शिवसैनिकांना आवाहन
शिवसेना नेते संजय राऊत
Image Credit source: social
Follow us on

मुंबई : महाविकास आघाडी सरकार (Maharashtra state Govenment) आणि केंद्रासह राज्यातील भाजपचे (BJP) नेते यांच्यात रोज आरोप-प्रत्यारोप, टीका टिप्पणी सुरू असते. रोज सकाळी दहा वाजेदरम्यान शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) माध्यमांना प्रतिक्रिया देतात. ही प्रतिक्रिया अनेकदा केंद्र विरुद्ध राज्यातील संघर्षावरच असते. एकदा राऊतांची प्रतिक्रिया आली की त्यावर दिवसभर भाजपचे नेते पलटवार करताना दिसतात. त्यामुळे शिवसेनेकडून कुणी माध्यमांवर सर्वाधिक दिसत असेल तर खासदार संजय राऊतांचं नाव अग्रक्रमावर येतं. याच मुद्द्याला धरुन मुंबईतील युवासेनेच्या एका कार्यक्रमात संजय राऊतांनी तरुण शिवसैनिकांना मार्गदर्शन केलंय. ‘रोज ऊठा हल्ला करा, बेडरपणे हल्ला करा, केवळ राऊत, सावंत बोलून चालणार नाही,’ असं यावेळी राऊत म्हणाले.

‘मी रोज बोलतो, माझा नाईलाज’

‘सोशल मीडिया कसा हाताळावा’ या युवासेनेच्या कार्यक्रमात राऊतांनी युवकांना सोशल मीडियावर सक्रिय राहण्याचं आवाहन केलंय. यावेळी त्यांनी शिवसेनेकडे माध्यमांवर बोलण्यासाठी युवा नेतृत्व नसल्याचंही मान्य केलंय. ते म्हणाले की, ‘मी रोज सकाळी बोलतो माझा नाईलाज आहे. मी नाही बोललो सकाळी तर दिवसभर पक्षाचा कार्यक्रम सेट होणार नाही. दूरदर्शनवर सोशल मीडियावर सातत्याने शिवसेना शिवसेना येण्यासाठी मी इच्छा नसतानाही रोज सकाळी बोलतो. मी जर बोललो नाही तर दिवसभरात सोशल मीडियावर शिवसेना दिसणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियात शिवसेना दिसणार नाही.’

‘आपली टीम लहान, पण ताकद ओळखा’

भाजपच्या मीडिया सेलचा संदर्भ देताना राऊत म्हणाले की, ‘उत्तर प्रदेशातील निवडणुकातही भाजप नेत्यांनी सोशल मीडियाचं ट्रेनिंग दिलं. हिजाबपासून अनेक मुद्दे त्यांनी प्रचारात आणले. त्या मानाने आपली टीम लहान आहे. परत सांगतो. हे युद्ध आहे. हे राज्य टिकवायचं असेल या प्रवृत्ती विरुद्ध लढायचं असेल तर समोरच्या लोकांची ताकद आणि त्यांच्या भूमिका त्यानुसार आपल्या लोकांना तयार करावं लागेल.’

हे सुद्धा वाचा

‘बेडरपणे हल्ला करा’

यावेळी राऊतांनी महाराष्ट्र सरकार आपल्या हातात असल्याचाही उल्लेख केला. ते म्हणाले की, ‘सैन्य पोटावर चालतो. शिवसेनाप्रमुखांच्या काळात एक पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती. आता युद्ध वडापाववर होणार नाही. आता आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या हातात. हे राज्य आपण भाजपकडून खेचून घेतलं आहे. आपल्यावरील हल्ले परतवायचे असेल तर संजय राऊत आणि अरविंद सावंत असून उपयोगी नाही. हजारो लोक पाहिजे. रोज उठलं पाहिजे हल्ला केला पाहिजे. बेडरपणे हल्ला केला पाहिजे आणि परिणामांची पर्वा न करता. मी रोज सकाळी बोलतो माझा नाईलाज आहे. मी नाही बोललो सकाळी तर दिवसभर पक्षाचा कार्यक्रम सेट होणार नाही. दूरदर्शनवर सोशल मीडियावर सातत्याने शिवसेना शिवसेना येण्यासाठी मी इच्छा नसतानाही रोज सकाळी बोलतो. मी जर बोललो नाही तर दिवसभरात सोशल मीडियावर शिवसेना दिसणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियात शिवसेना दिसणार नाही.’