AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: इच्छा नसताना रोज सकाळी मी बोलतो, राऊत असं का म्हणाले?

समोरच्या लोकांची ताकद आणि त्यांच्या भूमिका त्यानुसार आपल्या लोकांना तयार करावं लागेल. सैन्य पोटावर चालतो. शिवसेनाप्रमुखांच्या काळात एक पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती. आता युद्ध वडापाववर होणार नाही. आता आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या हातात, असे म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

Sanjay Raut: इच्छा नसताना रोज सकाळी मी बोलतो, राऊत असं का म्हणाले?
इच्छा नसताना रोज सकाळी मी बोलतो, राऊत असं का म्हणाले?Image Credit source: tv9
| Updated on: May 08, 2022 | 3:54 PM
Share

मुंबई : शिवसेनेच्या भात्यातला सर्वात तीक्ष्ण बाण म्हणून शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना ओळखलं जातं. सामनातून आपल्या लेखातून आणि रोज माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेतून राऊत नेहमीच भाजपवर तुटून पडतात. आज पुन्हा तेच दिसून आलं आहे. संजय राऊतांनी आज पुन्हा चौफेर बॅटिंग करत भाजपवर (BJP) सडकडून टीका केली आहे. उत्तर प्रदेशातील निवडणुकातही भाजप नेत्यांनी सोशल मीडियाचं ट्रेनिंग दिलं. हिजाबपासून अनेक मुद्दे त्यांनी प्रचारात आणले. त्या मानाने आपली टीम लहान आहे. परत सांगतो. हे युद्ध आहे. हे राज्य टिकवायचं असेल या प्रवृत्ती विरुद्ध लढायचं असेल तर समोरच्या लोकांची ताकद आणि त्यांच्या भूमिका त्यानुसार आपल्या लोकांना तयार करावं लागेल. सैन्य पोटावर चालतो. शिवसेनाप्रमुखांच्या काळात एक पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती. आता युद्ध वडापाववर होणार नाही. आता आपल्याला महाराष्ट्रात सत्ता आहे. महाराष्ट्र सरकार आपल्या हातात, असे म्हणत राऊतांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.

इच्छा नसताना मी बोलतो

तसेच हे राज्य आपण भाजपकडून खेचून घेतलं आहे. आपल्यावरील हल्ले परतवायचे असेल तर संजय राऊत आणि अरविंद सावंत असून उपयोगी नाही. हजारो लोक पाहिजे. रोज उठलं पाहिजे हल्ला केला पाहिजे. बेडरपणे हल्ला केला पाहिजे आणि परिणामांची पर्वा न करता. मी रोज सकाळी बोलतो माझा नाईलाज आहे. मी नाही बोललो सकाळी तर दिवसभर पक्षाचा कार्यक्रम सेट होणार नाही. दूरदर्शनवर सोशल मीडियावर सातत्याने शिवसेना शिवसेना येण्यासाठी मी इच्छा नसतानाही रोज सकाळी बोलतो. मी जर बोललो नाही तर दिवसभरात सोशल मीडियावर शिवसेना दिसणार नाही. इलेक्ट्रॉनिक मीडियात शिवसेना दिसणार नाही, असेही राऊत म्हणाले.

आपण नैतिकता संभाळात बसलोय

तर शिवसनेच्या नत्यांना उद्देशून बोलताना संजय राऊत म्हणाले. वरुण सरदेसाई तुम्ही आज गालातल्या गालात हसतात पण तुम्हाला याच मार्गाने जावं लागेल. आपल्या देशात विरोधकांना बदनाम करण्याची मोहीम सुरू झाली. काँग्रेस ते शिवसेनेची बदनामी होत आहे. ही गोबेल्स निती आहे. आपण या नीतीपासून दूर राहतो. पण त्याच माध्यमातून आपली बदनामी झाली आपण फक्त नैतिकता सांभाळत बसलोय, असेही संजय राऊत यावेळी म्हणाले. येत्या काही दिवसात राज्यात बडा महापालिकांच्या तसेच इतर निवडणुका पार पडत आहे. त्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊतांनी सभांचा सपाटा लावला आहे. येत्या निवडणुकीसाठी सेनेने जोरदार कंबर कसली आहे. भाजपचेही बडे नेते मैदानात उतरले आहेत. त्यामुळे हा संघर्ष आता वाढताना दिसून येत आहे.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.