AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ज्यांनी एसटी बँकेत भ्रष्टाचार केला त्यांना जेलमध्ये जावेच लागेल; ही तर कष्टकऱ्यांची ताकत – सदावर्ते

वकील गुणरत्न सदावर्ते हे आता सक्रिय राजकारणात प्रवेश करण्याची शक्यता आहे. ते एसटी बँकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना जेलमध्ये जावेच लागेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.

ज्यांनी एसटी बँकेत भ्रष्टाचार केला त्यांना जेलमध्ये जावेच लागेल; ही तर कष्टकऱ्यांची ताकत - सदावर्ते
गुणरत्न सदावर्तेImage Credit source: tv9
| Updated on: May 08, 2022 | 3:29 PM
Share

मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते (Gunranta Sadavrte) हे आता सक्रीय राजकारणात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. सदावर्ते हे एसटी बँकेची (ST Bank) निवडणूक (Election) लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत बोलताना सदावर्ते यांनी म्हटले आहे की, ज्यांनी – ज्यांनी बँकेत भ्रष्टाचार केला त्या सर्वांवर ईडी कारवाई करेल, त्यांना जेलमध्ये जावे लागणार आहे. राज्यभरातून मला प्रतिसाद मिळत आहे. कष्टकरी जनता मला पुष्पमाला पाठवत आहेत. ही कष्टकऱ्यांची शक्ती आहे, मी कायमच कष्टकऱ्यांच्या बाजूनं लढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गुणरत्न सदावर्ते यांना 26 एप्रिल रोजी जामीन मिळाला त्यानंतर ते पुन्हा एकदा एसटी कार्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सक्रिय झाले आहेत. मात्र ते यावेळी आपली भूमिका ही आंदोलनातून नव्हे तर प्रत्यक्षात निवडणुकीच्या माध्यमातून मांडण्याची शक्यता आहे. गुणरत्न सदावर्ते हे एसटी बँकेची निवडणूक लढवणार असून, ते एसटी बँकेच्या निवडणुकीत आपले स्वतःचे पॅनल उभे करणार असल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडीवर निशाणा

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर देखील निशाणा साधला आहे. मला जेलमध्ये टाकून नामोहरम करता येणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. आम्ही कष्टकर्ते आहोत, आम्ही कायमच कष्टकऱ्यांच्या पाठिशी उभे राहू मला राज्यभरातून पुष्पगुच्छ येत आहेत, ही कष्टकऱ्यांची शक्ती आहे. यावेळी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना देखील टोला लगावला आहे. आम्ही वयोवृद्ध राजकारण्याला चॅलेंज करणार नाहीत, शरद पवार हे आमच्यासोबत कधी स्पर्धा करूच शकत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही लढाई शेतातील बुजगावण्यासारखी नसल्याचे देखील यावेळी सदावर्ते म्हणाले आहेत.

बँकेचे 90 हजार सदस्य

सदावर्ते आता सक्रिय राजकारणात प्रवेश करणार आहेत. ते इथून पुढे आपली भूमिका निवडणुकीच्या माध्यमातून मांडणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गुणरत्न सदावर्ते हे एसटी बँकेची निवडणूक लढवणार आहेत. त्यासाठी ते आपला पॅनल देखील उभा करणार असल्याची माहिती समोर येत आहे. एसटी बँकेची स्थापना एसटी कर्मचाऱ्यांसाठी करण्यात आली आहे. या बँकेत जावळपास 90 हजार सदस्य असून एसटी बँकेच्या 50 शाखा राज्यभरात आहेत. दरम्यान गेले सहा महिने एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन केले होते. या आंदोलन काळात त्यांचा पगार झाला नाही. पगार न झाल्याने ज्या कर्मचाऱ्यांनी एसटी बँकेकडून लोन घेतले होते, त्यांचे हफ्ते देखील थकले आहेत. ज्या कर्मचाऱ्यांनी हफ्ते भरले नाहीत, त्यांना मतदानाला मुकावे लागण्याची शक्यता आहे.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....