गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा, अजेंडाही सांगितला; काँग्रेसला टक्कर देणार?

जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला जे करणं शक्य होतं ते मी केलं. जे करणं शक्य नव्हतं ते मी दिल्लीच्या माध्यमातून केलं. माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी जम्मू-काश्मीरसाठी भरपूर काम केलं. डबल-ट्रिपल शिफ्टमध्ये मी काम केलं.

गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा, अजेंडाही सांगितला; काँग्रेसला टक्कर देणार?
गुलाम नबी आझाद यांच्याकडून नव्या पक्षाची घोषणा, अजेंडाही सांगितला; काँग्रेसला टक्कर देणार? Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 3:18 PM

श्रीनगर: काँग्रेसला (Congress) सोडचिठ्ठी दिल्यानंतर गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. माझ्या पक्षाचं नाव हिंदुस्तानी (hindustani) असेल. हिंदू, मुस्लिम, शीख आणि ईसाई या सर्वांचा हा पक्ष असेल. काही लोक माझ्या पक्षाचं नाव जाहीर करत आहेत. ही चुकीची नावे आहेत. माझ्या पार्टीचं नावच काय, झेंडाही जम्मू-काश्मीरचे लोकच ठरवतील. माझ्या पक्षाचं नाव अमूक आहे आणि माझा झेंडा तमूक आहे, असं फरमान मी दिल्लीत बसून सोडणार नाही. माझ्याकडे बरीच नावे आली आहेत. त्यातील काही नावे उर्दू आहेत. तर काही संस्कृत आहेत. पण माझ्या पक्षाचं नाव हिंदुस्तानी असेल. हा पक्ष सर्वांचाच असेल, असं गुलाम नबी आझाद यांनी स्पष्ट केलं आहे.

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या अजेंड्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. माझ्या विधानसभेत लेफ्टनंट गव्हर्नर नव्हे तर गव्हर्नर असेल. लोकांना त्याच्या जमिनी मिळाव्यात. जम्मू-काश्मीरच्या लोकांना रोजगार मिळावा. बिहारमधील कुणालाही जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी मिळू नये. तसेच काश्मिरी पंडितांचं काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन व्हावं हा माझा अजेंडा आहे, असं गुलाम नबी आझाद म्हणाले.

रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणार

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये काश्मिरी पंडितांच्या हत्या होत आहेत. त्या बंद झाल्या पाहिजे. रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करण्यासाठी माझ्याकडे भंडार आहे. जम्मू-काश्मीरच्या एका एका डोंगरात पर्यटन स्थळ निर्माण करून रोजगाराची निर्मिती करता येऊ शकते. जम्मू-काश्मिरातही पर्यटन स्थळ आहे. तिथपर्यंत रस्ते बनविण्याची गरज आहे. आज जेवढेही कार्यकर्ते आणि नेते इथे आले आहेत. ते मला विचारून आलेनाहीत. किंवा मला विचारून राजीनामा दिलेला नाही. काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. तेव्हा मी त्यांचे मनापासून आभार मानले. जम्मू-काश्मीरमधील तरुणांना रोजगार देणे आणि रोजगारांची निर्मिती करणे हाच आमचा अजेंडा आहे, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

जम्मू-काश्मीरसाठी खूप काही केलं

जेव्हा मी मुख्यमंत्री होतो, तेव्हा मला जे करणं शक्य होतं ते मी केलं. जे करणं शक्य नव्हतं ते मी दिल्लीच्या माध्यमातून केलं. माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात मी जम्मू-काश्मीरसाठी भरपूर काम केलं. डबल-ट्रिपल शिफ्टमध्ये मी काम केलं. ट्युलिप गार्डन माझ्याच कार्यकाळात तयार झालं आहे. प्रवासी निवाज हज हाऊस आणि अनेक कामे मी केले याचा मला अभिमान आहे, असंही ते म्हणाले.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.