पटोलेंनी गडकरींना एका मतानेही हरवून दाखवावं, संन्यास घेईल : गिरीश महाजन

मुंबई : एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर एनडीए आणि यूपीएमधील प्रमुख नेते सक्रिय झाले आहेत. पण महाराष्ट्रातील जागांचे जे अंदाज आले आहेत, त्यात युतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मी पाच लाख मतांनी पराभव करेन, असा दावा काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केलाय. पटोलेंना भाजप नेते गिरीश महाजन यांनीही […]

पटोलेंनी गडकरींना एका मतानेही हरवून दाखवावं, संन्यास घेईल : गिरीश महाजन
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : एक्झिट पोलच्या आकड्यांनंतर एनडीए आणि यूपीएमधील प्रमुख नेते सक्रिय झाले आहेत. पण महाराष्ट्रातील जागांचे जे अंदाज आले आहेत, त्यात युतीच्या जागा कमी होताना दिसत आहेत. विशेष म्हणजे नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मी पाच लाख मतांनी पराभव करेन, असा दावा काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी केलाय. पटोलेंना भाजप नेते गिरीश महाजन यांनीही आव्हान दिलं. पाच लाख सोडा, गडकरींपेक्षा एक मतही जास्त घेऊन दाखवा, असं आव्हान गिरीश महाजनांनी दिलं.

टीव्ही 9 मराठीवर बोलताना गिरीश महाजन आणि नाना पटोले आमनेसामने होते. यावेळी दोघांनी एकमेकांना आव्हान दिलं. गडकरींना यावेळी पाच लाख मतांनी हरवणार असं विश्वासाने पटोलेंनी सांगितलं. गिरीश महाजनांनी पटोलेंना आव्हान देत, गडकरींपेक्षा एक मतही जास्त घेऊन दाखवा, असं उत्तर दिलं. नाना पटोले निवडून आले तर मी निवृत्ती घेईन आणि निवडून न आल्यास त्यांनी निवृत्ती घ्यावी, असं आव्हान महाजनांनी दिलं. पटोलेंनीही हे आव्हान स्वीकारलं. विदर्भात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं खातं उघडणंही कठीण असल्याचं गिरीश महाजन म्हणाले.

“काँग्रेसला विरोधी पक्ष नेतेपदाचा दर्जाही मिळणार नाही”

2014 च्या निवडणुकीत काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदही मिळालं नव्हतं. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान 10 टक्के जागा मिळवणं आवश्यक असतं. काँग्रेसला 44 जागा जिंकता आल्या होत्या. यावेळीही काँग्रेसला 50 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत, असं गिरीश महाजन म्हणाले.

“मंत्री पद न मिळाल्याने पक्ष सोडणाऱ्यांनी बोलू नये”

नाना पटोलेंनी 17 राज्यात दौरा करुन आल्याचं सांगितलं. पण त्यापेक्षा त्यांनी विदर्भात लक्ष घालून एखादी जागा जिंकवून आणायची होती, असा टोला लगावला. यावेळी नाना पटोले आणि गिरीश महाजन यांची शाब्दिक बाचाबाचीही झाली. पटोलेंनी महाजनांचा एकेरी उल्लेख केला. मंत्रीपद न मिळाल्याने पक्ष बदलणाऱ्यांनी असं बोलू नये, तुम्ही गडकरींपेक्षा एकही मत जास्त घेऊन दाखवा, असं आव्हान गिरीश महाजन यांनी दिलं.

पाहा व्हिडीओ :

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.