‘तो फक्त पोरींचे फोन उचलतो’, खडसेंच्या ऑडिओ क्लिपला गिरीश महाजनांचं सडेतोड उत्तर

एकनाथ खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला (Girish Mahajan reaction on Eknath Khadse controversial Statement in viral audio clip).

'तो फक्त पोरींचे फोन उचलतो', खडसेंच्या ऑडिओ क्लिपला गिरीश महाजनांचं सडेतोड उत्तर
जळगाव जिल्हा बँकेची निवडणूक बिनविरोध होण्याची चिन्हे!
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 5:46 PM

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. या ऑडिओ कल्पीमध्ये खडसे यांनी भाजपचे जामनेरचे आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याबाबत अनेक आक्षेपार्ह विधाने केली आहेत. या क्लीपवर आता गिरीश महाजन यांच्याकडून सडेतोड प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. खडसे यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यामुळे ते अशाप्रकारे विधान करत आहेत, असा टोला महाजन यांनी लगावला (Girish Mahajan reaction on Eknath Khadse controversial Statement in viral audio clip).

गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

“मी खडसे यांना दोष देणार नाही. वाढतं वय, एवढे आजार आणि त्यामध्ये जो माणूस मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा करत होता त्याला बिचाऱ्याला आमदारकीपण मिळत नाहीय. त्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्यासारखं आहे. त्यामुळे मला त्यांच्याबद्दल कोणताही रोष नाही. त्यांनी बोलत राहावं. लोकांना आणि सगळ्यांना कोण काय आणि कोण काय नाही ते माहिती आहे. पण खूप वेगळ्या मनस्थितीत ते सध्या आहेत”, असं म्हणत महाजन यांनी खिल्ली उडवली (Girish Mahajan reaction on Eknath Khadse controversial Statement in viral audio clip).

नेमकं प्रकरण काय?

एकनाथ खडसे यांच्या दूरध्वनीवरील संभाषणाची एक ऑडिओ क्लीप सध्या व्हायरल झाली आहे. या क्लीपमध्ये जामनेरमधील एक ग्रामस्थ पाणी नसल्याची तक्रार एकनाथ खडसे यांना करताना ऐकू येत आहे. त्यावर एकनाथ खडसे यांनी मग मग तुमचा आमदार गिरीश मेला का?, असे वक्तव्य केले.

एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?

जामनेरच्या वाकोदजवळ असलेल्या वडगाव बुद्रूक गावातील एका गावकऱ्याने एकनाथ खडसे यांना फोन केला होता. त्याने आपल्या गावात पाणी नसल्याची समस्या मांडली. त्यावर एकनाथ खडसे यांनी तुमचा आमदार गिरीश इकडे-तिकडे बायकांच्यामागे फिरतोय का , असे म्हटले.

त्यावर गावकऱ्याने गिरीश महाजन आपला फोन उचलत नसल्याचे सांगितले. तेव्हा एकनाथ खडसे यांनी, तो (गिरीश महाजन) फक्त पोरींचेच फोन उचलतो, असे म्हटले. तसेच आपल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न सोडवायचे सोडून गिरीश महाजन पश्चिम बंगालमध्ये काय फिरत बसलेत, अशी टिप्पणीही एकनाथ खडसे यांनी केली.

एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांच्या प्रतिक्रियेचा व्हिडीओ बघा :

एकनाथ खडसे यांची व्हायरल होणारी ऑडियो क्लीप सविस्तर ऐका :

संबंधित बातमी : ‘गिरीश महाजन बायकांच्या मागे फिरतो, फक्त पोरींचे फोन उचलतो’, एकनाथ खडसेंची वादग्रस्त ऑडिओ क्लीप व्हायरल

Non Stop LIVE Update
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.