विखे पाटलांची आम्हाला अॅलर्जी नाही, गिरीश महाजनांकडून जाहीर ऑफर

विखे पाटलांची आम्हाला अॅलर्जी नाही, गिरीश महाजनांकडून जाहीर ऑफर

अहमदनगर : काँग्रेसचे नेते आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील हे भाजपात जाणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. “आम्हाला कुणाचीही अॅलर्जी नाही. विखे पाटलांनी तिकिटाची मागणी केली, तर वरिष्ठ पातळीवर त्याचा निर्णय घेतला जाईल. आता कमळ हातात घ्यायचा का? हा विखे पाटलांचा व्यक्तीगत प्रश्न आहे”, असे वक्तव्य राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन केलं.

गिरीश महाजन हे अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालूक्यात निळवंडे धरणाच्या कालव्याच्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री राम शिंदेही उपस्थित होते.

राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखेंसाठी राष्ट्रवादी दक्षिण नगरची जागा सोडायला तयार नाही. त्यामुळे आता विखे पाटील भाजपात प्रवेश घेणार का? या चर्चेला उधाण आलं आहे.

“विखे पाटील यांनी भाजपाकडे तिकीटाची मागणी केली, तर त्यावर निर्णय घेतला जाईल. आता त्यांनी कमळ हातात घ्यायचा की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे”, असे महाजन म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही गिरीश महाजनांनी सडकून टीका केली.

“शरद पवारांना सध्या पंतप्रधान पदाचे स्वप्न पडत आहेत. मात्र, गेल्यावेळी आम्हाला 42 जागा मिळाल्या होत्या. यावेळी  काँग्रेस राष्ट्रवादीचा पूर्णपणे सुपडासाफ होणार आहे, अनेकांचा बॅण्ड वाजणार आहे, त्यामुळे पवारांचे स्वप्न हे स्वप्नच राहणार”, अशी खोचक टीका गिरीश महाजन यांनी केली.

“आघाडी सरकारमध्ये मधुकरराव पिचड मंत्री असताना अकोले तालूक्यात निळवंडे धरणाच्या कालव्यांचे भूसंपादन झाले. आता ही जागा सरकारच्या मालकीची असून कालव्यांच्या कामाला आडवे येऊ नका, ही दादागिरी चालणार नाही”, असा सूचक इशाराही गिरीश महाजन यांनी राष्ट्रवादीच्या मधुकरराव पिचडांना दिला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI