AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मिरजेत मध्यरात्री हॉटेलचं पाडकाम, गोपीचंद पडळकर यांच्या भावावर गंभीर आरोप, स्थानिकांचा अल्टिमेटम

सांगलीतील मिरजमध्ये मध्यरात्री पाडकाम करण्यात आलं आहे. यावरून भाजपचे विधान परिषदेतेचे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत. वाचा...

मिरजेत मध्यरात्री हॉटेलचं पाडकाम, गोपीचंद पडळकर यांच्या भावावर गंभीर आरोप, स्थानिकांचा अल्टिमेटम
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jan 07, 2023 | 10:37 AM
Share

मिरज : सांगलीतील मिरजमध्ये मध्यरात्री पाडकाम करण्यात आलं. मध्यरात्री दोन वाजता एसटी स्टॅन्डजवळ हे पाडकाम करण्यात आलं आहे. या पाडकामावर स्थानिकांनी आक्षेप घेतला आहे. भाजपचे विधान परिषदेतेचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर (Brahmanand Padalkar) यांच्या विरोधात स्थानिक आक्रमक झाले आहेत.

“सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे आमचे आमदार आहेत. त्यांनी जाहीर करावं की या कृत्यामध्ये त्यांचाही सहभाग आहे का? जर खाडे यांचा या प्रकरणाशी संबंध नसेल तर गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर आणि त्यांच्यासोबत आलेले दीड-दोन हजार गुंड या सगळ्यांवर योग्य त्या कलमानुसार गुन्हे दाखल करण्याची मागणी करतो”, असं स्थानिक नागरिकांची मागणी आहे.

जर आज दुपारी 12 वाजेच्या आधी या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले नाहीत तर आम्ही सगळे लोक आमच्या कुटुंबासह सुरेश खाडे यांच्या कार्यालयाबाहेर उपोषण करू, असा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

या सगळ्या प्रकरणवर आम्ही गोपीचंद पडळकर यांच्याशी फोनवरून बातचित केली. त्यावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मिरजेत दुकानं पाडण्यात आली आहेत. ते पाडकाम कायदेशीर आहेत, असं आमदार गोपीचंद पडळकर यांनी फोनवरून सांगितलं.

चार हॉटेल काल रात्री पाडण्यात आलेत. या ठिकाणी 4 जेसीबींच्या सहाय्याने हे पाडकाम करण्यात आलंय. या पाडकामावरून नागरिक अतिशय आक्रमक झाले आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर आणि त्यांचे भाऊ ब्राह्मनंद पडळकर यांनी जे बांधकाम पाडले आहे ते चुकीचं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी संतप्त नागरिक करत आहेत. मिरजमधील वातावरण सध्या चांगलंच तापलं आहे. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

Follow Us
गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील ...
Sanjay Raut | गणेश चतुर्थीच्या दिवशी संजय राऊतांची बाप्पाकडे खास मागणी; देशावरील हुकूमशाही...
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली..
कोकणात गणेशोत्सवाचा उत्साह! महिलांनी पारंपारिकरित्या डोक्यावरून आणली बाप्पांची मूर्ती
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव...
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांची अलोट गर्दी, शिव शंकर थीम ठरतेय आकर्षण
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश,
CM देवेंद्र फडणवीस यांचा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खास संदेश, ट्वीट करत दिल्या शुभेच्छा
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
टीव्ही 9 मराठी न्यूजरूममध्ये गणपती बाप्पाची पारंपरिक उत्साहात आरती
परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स...
FDA Raid | परभणीत दूध पेढीवर FDAची धडक कारवाई! रिशा मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्सचा अन्न परवाना निलंबित
गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात...
Mumbai | गणेशोत्सवाआधी BMCचा मोठा निर्णय! रस्ते-पदपथ अडवणाऱ्या जाहिरात फलकांवर बंदी; उल्लंघन केल्यास कारवाई होणार
पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात
Nashik | पाईप दिसला नाही अन् काळाचा घाला! नाशिकमध्ये भीषण अपघात; संतप्त नागरिकांचा महापालिकेत ठिय्या
बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर
Navi Mumbai | बिकानेरच्या रसमलाईत चक्क बुरशी! कामोठ्यात धक्कादायक प्रकार समोर; दुकान मालकाने चूक मान्य करत...
मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात..
Mumbai Local | मध्य रेल्वेची लोकल सेवा ठप्प! कल्याण स्थानकवरून प्रवाशांवर भर पावसात रुळावरून पायी चालण्याची आली वेळ