Gopichand Padalkar : सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका

जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायची याची रचना केली होती. माझ्यावर देखील एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न 15 दिवसांपूर्वी केला होता. तसा आदेश जयंत पाटील यांनी पोलिसांना दिला असल्याचं देखील त्यांनी जाहीर सभेत सांगितलं.

Gopichand Padalkar : सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका
सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या चेहऱ्यावर, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांची जोरदार टीका
Image Credit source: tv9 marathi
महेश घोलप, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 16, 2022 | 11:54 AM

सांगली – सरकार गेलेलं सुतक आजही जयंत पाटलांच्या (Jayant Patil) चेहऱ्यावर आहे. शरद पवार (Sharad Pawar) कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून कधी जातोय अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाल्याचा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी केली आहे. सांगलीच्या वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने आयोजित समारंभात बोलत होते. त्यावेळी त्यांनी जयंत पाटील यांच्यावरती जोरदार टीका केली. तसेच महाविकास आघाडी सरकारने मागच्या अडीच वर्षात काय केलं याचा पाढा देखील त्यांनी वाचला. जयंत पाटलांनी मागच्या अडीच वर्षात सांगलीत काय केलं हे सुद्धा पडळकरांनी सांगितले.

जयंत पाटलांनी मला अडकवण्याचा प्रयत्न केला होता

जयंत पाटलांनी सदाभाऊ खोत आणि त्यांच्या मुलावर गुन्हे दाखल करायची याची रचना केली होती. माझ्यावर देखील एका अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न 15 दिवसांपूर्वी केला होता. तसा आदेश जयंत पाटील यांनी पोलिसांना दिला असल्याचं देखील त्यांनी जाहीर सभेत सांगितलं. “याला यात अडकावा, पण आम्ही घाबरलो नाही. रोज लढत राहिलो. पण 20 तारखेला विधान परिषदेचा निकाल लागला. त्यानंतर सेना आमदार सुरतला गेलेली बातमी आल्यानंतर जयंत पाटलांचा चेहरा बघा आजच्या तारखेपर्यंत त्यांचे सुतक गेले नाही अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावरती केली.

हे सुद्धा वाचा

जयंत पाटलांच्यावरचं सुतक अजून गेलं नाही

जयंत पाटील यांची सत्ता असेल तर काम करू शकता. सत्तेच्या विरोधात तुम्ही काम करू शकत नाही. शरद पवार कधी घरात बसतात आणि मी पार्टी सोडून जातो अशी भावना जयंत पाटलांची निर्माण झाली आहे. त्यावर जयंत पाटील काय उत्तर देतात हे पाहावं लागेल. सांगलीतील भाजपचे नेते आणि जयंत पाटील यांच्यात मागच्या काही वर्षात कायम संघर्ष राहिला आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना अनेक गोपीचंड पडळकरांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांच्यावरती टीका केली आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें