शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा, गोपीचंद पडळकरांचा अनिल परब यांना सल्ला

| Updated on: Jan 11, 2022 | 11:29 AM

भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन (ST Workers Strike) परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना लक्ष्य केलंय.

शरद पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वत: पुढं जाऊन संप मिटवा, गोपीचंद पडळकरांचा अनिल परब यांना सल्ला
गोपीचंद पडळकर
Follow us on

पुणे : भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन (ST Workers Strike) परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांना लक्ष्य केलंय. मंत्री अनिल परब यांना विनंती करायची की आपण हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून सगळे दरवाजे ठोठावत आहात. त्यापेक्षा स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत?असा सवाल गोपीचंद पडळकर यांनी केलाय.

एसटी कर्मचाऱ्यांना भेटावं

गोपीचंद पडळकर यांनी अनिल परब यांनी स्वत: एसटी कर्मचाऱ्यांना भेटावं आणि ठामपणे आश्वासित करावं की बडतर्फीची कार्यवाही मागे घेण्यात येईल जेणेकरुन चर्चेचा मार्ग मोकळा होईल, असं म्हटलंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होतेच की मी माझ्या मंत्र्यांना स्वतः मोर्चाला समोरे जाण्यास सांगेल, याची आठवण देखील पडळकर यांनी करुन दिलीय.

दोन पाऊल पुढे जाऊन मार्ग काढा

माझ्या विनंतीचा नाही तर किमान उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या जनतेला दिलेल्या शब्दाचा तरी मान राखा आणि दोन पाऊल पुढे जाऊन आपुलकीने त्यांची समजूत काढा,चर्चा करा आणि यावर तोडगा काढा, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

एसटी कर्मचाऱ्यांचं गोपीचंद पडळकर यांच्याकडून अभिनंदन

गोपीचंद पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांनी एकजुटीनं लढा दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करत असल्याचं म्हटलंय. एसटी कर्मचाऱ्यांनी कुठल्याही युनियनची सभासद फी भरली नाही. महसूलात घट आणली आणि त्यामुळेच शरद पवार साहेबांना आज तुमच्या विषयाबद्दल खुलेआम तुमच्या सोबत चर्चा करण्यास भाग पाडले, असं गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत.

पुण्यातील एसटी कर्मचारी संपावर ठाम

परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत चर्चा केली. त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेनं वकील बदलण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी गुणरत्न सदावर्ते हे आमचे वकील असल्याचं म्हटलं आहे. 22 संघटनांना आम्ही मूठमाती दिल्याचं एसटी कर्मचारी म्हणाले आहेत.

इतर बातम्या:

संरक्षण मंत्र्यांपाठोपाठ भाजपाध्यक्षही कोरोना पॉझिटिव्ह! संपर्कातील लोकांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन

Lal Bahadur Shastri | मोदींच्या 12 कोटीच्या कारची चर्चाय, तेव्हा 12,000/-ची कार घेताना शास्त्रींनी लोन काढलेलं

Gopichand Padalkar said Anil Parab should discuss with ST Workers for solution