संरक्षण मंत्र्यांपाठोपाठ भाजपाध्यक्षही कोरोना पॉझिटिव्ह! संपर्कातील लोकांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन

देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डाही कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे.

संरक्षण मंत्र्यांपाठोपाठ भाजपाध्यक्षही कोरोना पॉझिटिव्ह! संपर्कातील लोकांना टेस्ट करुन घेण्याचं आवाहन
jp nadda

फक्त महाराष्ट्रातच नाही, तर दिल्लीतही कोरोनाचा कहर सुरू आहे. महाराष्ट्रात जवळपास 50 पेक्षा जास्त नेते कोरोना पॉझिटिव्ह आले असतानाच आता दिल्लीतल्या नेत्यांनाही कोरोनाचा विळखा वाढतोय. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर आता भाजपचे अध्यक्ष जे.पी नड्डाही कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली आहे. त्यांनी त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करून घेण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

दिल्लीत नेत्यांना कोरोनाचा विळखा वाढला

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात राजकीय, धार्मिक कार्यक्रम आणि कित्येक विवाहसोहळे झाले, त्याला महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी उपस्थिती लावली असल्याने राज्यात सध्या 50 पेक्षा जास्त नेते कोरोनाबाधित झाल्याची आकडेवारी समोर आली. मंत्रिमंडळातील डझनभर मंत्रीही कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. त्यानंतर दिल्लीतल्या नेत्यांची डोकेदुखी वाढताना दिसून येत आहे. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही एकापाठोपाठ एक नेते कोरोना पॉझिटिव्ह यायला सुरूवात झाली आहे. काही तासांपूर्वीच केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह कोरोना पॉझिव्ह आल्याची माहिती समोर आली होती, तर आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे त्यांनी भेट घेतलेल्या नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे टेन्शन आता वाढले आहे.

Mumbai Crime : अभिनेत्रीचे न्यूड फोटो काढून ब्लॅकमेल करणाऱ्या कास्टिंग डायरेक्टरला अटक

Face Reading | तुमचा चेहरा सांगतो तुमचे भविष्य, जाणून घ्या तुमचे नशीब काय सांगतय

Assembly Elections 2022 : यूपी, गोव्यासह मणिपुरात कमळ पुन्हा फुलणार? ओपनिअन पोल भाजपचं टेन्शन वाढवणारा

 

Published On - 9:48 pm, Mon, 10 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI