AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोपीनाथ मुंडेंचा घातपातच… करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा, पंकजा मुंडेंना विचारला सवाल

Karuna Munde : करुणा मुंडे यांनी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबाबत खळबळजनक दावा केला आहे. गोपीनाथ मुंडेंचा अपघात नसून घातपात होता असं त्यांनी म्हटलं आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

गोपीनाथ मुंडेंचा घातपातच... करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा, पंकजा मुंडेंना विचारला सवाल
karuna Munde on Gopinath MundeImage Credit source: Google
| Updated on: Mar 27, 2026 | 9:17 PM
Share

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील भायाळा गावात गणेशानंद गडाच्या नारळी सप्ताहाला त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी उपस्थित भाविक भक्तांशी आणि नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी, ‘गोपीनाथ मुंडे यांचे नाव जगाला विसरू देणार नाही, मी अशी शपथ चितेवर घेतली आहे. गोपीनाथ मुंडे या नावाच्या संस्कारावर किती विश्वास आहे. माझ्या कातड्याचे जोडे केले आणि तुमच्या पायात घातले तरी ही फेड होणार नाही’ असं विधान केले. यावर आता करुणा मुंडे यांनी भाष्य केले आहे.

करुणा मुंडेंचा पंकजा मुंडेंना सवाल

करुणा मुंडे यांनी म्हटले की, ‘पंकजाताई तुम्ही कधीपर्यंत गोपीनाथ मुंडेंच्या नावावर भावूक विधान करून राजकारण करणार आहात. तुम्हाला जर मुंडे साहेबांना न्याय द्यायचा आहे, तर तुम्ही मागणी करा की मुंडे साहेबांच्या एक्सीडेंट होता की मर्डर होता की घातपात? त्यांचा मर्डर होता की एक्सीडेंट होता या गोष्टीसाठी तुम्ही कधी सीबीआय SIT चौकशीची मागणी केली का? असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे.

मला सर्व गोष्टी माहिती आहेत…

पुढे बोलताना करुणा मुंडे यांनी म्हटले की, ‘मी मुंडे घराण्याची सून आहे आणि मला सर्व गोष्टी माहित आहेत. धन्या मुंडेला तुम्ही त्यांच्या चितेजवळ येऊ दिलं नव्हतं. मुंडे साहेबांच्या डोळ्यामध्ये पाणी आणणारा धन्या होता. तुम्ही शपथ खाल्ली होती की मी धनंजय मुंडेंसोबत मी कधी मांडवली करणार नाही. पण राजकारणामध्ये तुम्ही एवढे लाचार झालात की तुम्ही तुमचे शब्द विसरून गेलात.’

करुणा मुंडेंचा खळबळजनक दावा

करुणा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यूबाबत खळबळजनक दावा केला आहे. त्यांनी म्हटले की, मला सर्व गोष्टी माहिती आहेत, गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घातपात होता. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना चौकशीसाठी निवेदन देणार आहे. मी धनंजय मुंडे यांची बायको होते, आमच्या बेडरूममध्ये धनंजय मुंडे यांनी राजकारण केलेले आहे, मला सर्व गोष्टी माहिती आहे. पुढे बोलताना करुणा मुंडे म्हणाल्या की, ज्या ज्या व्यक्तीने माझ्यासोबत वाईट केलं आहे, धनंजय मुंडेच मंत्रिपद गेलं. आमदारकी सुद्धा जाणार आहे. वाल्मीक कराड जेलमध्ये आहे, तहसीलदार ट्रॅप झाला आणि आता रूपाली ताई यांचीही विकेट गेली आहे.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.