AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI World Cup 2027 स्पर्धेपूर्वीच भारतीय संघातून 5 खेळाडू आऊट, झालं असं की..

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेला अजून बराच अवधी शिल्लक आहे. पण टीम इंडियाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील अधुरं स्वप्न पूर्ण करण्याची तयारी सुरू झाली आहे. पण पाच खेळाडूंचा या स्पर्धेतून आधीच पत्ता कट झाला आहे.

ODI World Cup 2027 स्पर्धेपूर्वीच भारतीय संघातून 5 खेळाडू आऊट, झालं असं की..
ODI World Cup 2027 स्पर्धेपूर्वीच भारतीय संघातून 5 खेळाडू आऊट, झालं असं की..Image Credit source: BCCI
| Updated on: Mar 27, 2026 | 8:56 PM
Share

वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धा दक्षिण अफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया या तीन देशात होत आहे. ही स्पर्धेत एकूण 14 संघ खेळणार आहेत. स्पर्धेसाठी अजून दीड वर्षांचा अवधी शिल्लक आहे. पण टीम इंडियाने आतापासून तयारी सुरू केली आहे. या स्पर्धेसाठी खासकरून विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दोन दिग्गज खेळाडू तयारीला लागले आहे. दोघंही फक्त वनडे फॉर्मेट खेळत असून त्यांचं जेतेपदाचं स्वप्न आहे. रोहित शर्माने तर या स्पर्धेसाठी फिटनेसवरही काम केलं आहे. पण पाच खेळाडू असे आहेत की ते पुढच्या वनडे वर्ल्डकप 2027 स्पर्धेचा भाग नसतील. यात एक दिग्गज खेळाडू असा आहे की त्याने निवृत्ती जाहीर केली आहे. तर चार खेळाडूंचं वनडे संघातील प्रवास जवळपास संपुष्टात आला आहे.

सूर्यकुमार यादव : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकली. पण वनडे संघातील त्याचं स्थान डळमळीत झालं आहे. त्याला वनडे संघात जागा नाही असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. मागच्या वनडे वर्ल्डकप संघाचा भाग होता. पण त्याने सुमार कामगिरी केली. अंतिम फेरीतही खेळला पण काही खास करू शकला नाही. त्यामुळे आता वनडेतून कायमचा आराम दिला गेला आहे.

आर अश्विन: आर अश्विन हा भारतीय संघातील महत्त्वाचा फिरकीपटू आहे. वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळला होता. पण तेव्हा त्याला फक्त एका सामन्यात खेळण्याची संधी मिळली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या सामन्यात 34 धावा देत 1 विकेट घेतली. त्यानंतर त्याला प्लेइंग 11 मध्ये स्थानच मिळालं नाही. अश्विनने डिसेंबर 2024 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

मोहम्मद शमी : वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत खेळला होता. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यानंतर त्याला संधी मिळाली होती. त्याने फक्त 7 सामन्यात 24 विकेट काढल्या होत्या. चॅम्पियन्स ट्रॉफीतही खेळला होता. पण त्यानंतर फिटनेसचं कारण देत निवडकर्त्यांनी त्याला डावललं. आता त्याचं पुनरागमन होणं कठीण आहे.

रवींद्र जडेजा : रवींद्र जडेजाने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. न्यूझीलंडविरुद्ध त्याला 3 वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. पण तिन्ही सामन्यात फेल गेला. तीन सामन्यात 43 धावा केल्या. पण एकही विकेट मिळाली नाही. त्यामुळे त्याचा जागा अक्षर पटेल किंवा वॉशिंग्टन सुंदर घेऊ शकतो.

शार्दुल ठाकुर : अष्टपैलू शार्दुल ठाकुर याचंही वनडे संघातील पदार्पण कठीण आहे. मागच्या वर्ल्डकप स्पर्धेत खेळला होता. सुरूवातीच्या तीन सामन्यात खेळला . पण तिन्ही सामन्यात फेल गेला. शार्दुल ठाकुरने वनडे वर्ल्डकप 2027 मध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण त्याला संघात स्थान मिळणं कठीण आहे.

Follow Us
कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी ६.३६ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैस जमा
शेतकरी कर्जमाफीचा दुसरा हप्ता जारी: ६.३ लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ५,०८६ कोटी रुपये जमा
वडेट्टीवारांचं विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
वडेट्टीवारांचे मोठे विधान: फडणवीसांना २०२९ पर्यंतच पंतप्रधान होण्याची संधी
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला