Gulabrao Patil : उद्धव ठाकरेंनी तेव्हाच तह केला असता तर आज ही वेळ आली नसती; गुलाबराव पाटील यांचा टोला

Gulabrao Patil : हे भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. आदित्य ठाकरे यांनी याकडे त्याच नजरेने बघावं. सर्वात आधी मी पक्षातून फुटलो नव्हतो. 32 आमदार फुटल्यानंतर आधी मी उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांच्यासमोर आमदारांचं म्हणणं मांडलं. काही तरी निर्णय घेतील अशी अपेक्षा होती.

Gulabrao Patil : उद्धव ठाकरेंनी तेव्हाच तह केला असता तर आज ही वेळ आली नसती; गुलाबराव पाटील यांचा टोला
उद्धव ठाकरेंनी तेव्हाच तह केला असता तर आज ही वेळ आली नसती; गुलाबराव पाटील यांचा टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 21, 2022 | 9:58 AM

जळगाव: उद्धव ठाकरेंकडे मी 20 आमदार घेऊन गेलो होतो. एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासोबत सर्वात पहिला गेलेला मी आमदार नाही. 32 आमदार गेल्यानंतर 33 वा मी आहे. मी उद्धव ठाकरेंना भेटून गेलो. त्यांच्याकडे आमदारांची कैफियत मांडली. त्यात दुरुस्ती केली तर बरं झालं असतं असं त्यांना सांगितलं. असं म्हणतात शिवाजी महाराजही युद्धात तह करायचे. उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) थोडा तह केला असता तर ही वेळ आलीच नसती, असं राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी सांगितलं. अडीच वर्षापूर्वी उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे आदित्य ठाकरे महाराष्ट्रभर फिरले असते तर ही वेळ आली नसती. 32 वर्षाचे तरुण होते. ते राज्यभर फिरू शकले असते. हीच अपेक्षा होती. त्या काळातील अपेक्षा ते आज पूर्ण करत आहेत. परमेश्वर त्यांचं भलं करो, असा चिमटाही गुलाबराव पाटील यांनी काढला.

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील मीडियाशी संवाद साधत होते. आदित्य ठाकरे यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी दौरा केला असावा. त्यांच्या दौऱ्यात टीका केल्याशिवाय दुसरं कामच होऊ शकत नाही. आम्ही जो प्रयत्न केलेला आहे तो शिवसेना वाचवण्यासाठी केला आहे. तो प्रयत्न आदित्य ठाकरे यांना आवडलेला दिसत नाही, असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

हे युतीच सरकार

हे भाजप-शिवसेनेचे सरकार आहे. आदित्य ठाकरे यांनी याकडे त्याच नजरेने बघावं. सर्वात आधी मी पक्षातून फुटलो नव्हतो. 32 आमदार फुटल्यानंतर आधी मी उद्धव ठाकरेंना भेटलो. त्यांच्यासमोर आमदारांचं म्हणणं मांडलं. काही तरी निर्णय घेतील अशी अपेक्षा होती. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यामुळे मला इतर आमदारांसोबत जावं लागलं. छत्रपती शिवाजी महाराजांनीही युद्धामध्ये तह केले. उद्धव ठाकरे यांनीही तह केला असता तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा हल्ला त्यांनी चढवला.

शिवसंवाद यात्रेवर हल्ला

यावेळी आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेवरही त्यांनी हल्ला चढवला. आज जे आदित्य ठाकरे करत आहेत, तेच त्यांनी करावं हे आम्ही आधी सांगत होतो. अडीच वर्षापूर्वी जर ते फिरले असते तर ही वेळ आली नसती. आम्ही तेव्हा हेच सांगत होतो. ते आज करत आहेत. ते 32 वर्षाचे तरुण आहेत. त्यांनी राज्यभर फिरायला हवं होतं. आमची हीच अपेक्षा होती. ती ते आता पूर्ण करत आहेत. देव त्यांचं भलं करो, असा टोला त्यांनी लगावला.

खडसे चालतात, मग आम्ही गद्दार कसे?

ज्या एकनाथ खडसेंनी युती तोडली तुम्ही त्यांच्यासोबत बसता. आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी भाजपाशी युती केली मग आम्ही गद्दार कसे? आम्ही गद्दार नसून खुद्दार आहोत, असंही ते म्हणाले.

तर सत्तांतरण झाले नसते

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात आम्ही नुकतीच 50 थरांची दहीहंडी फोडल्याचं वक्तव्य केलं होतं. यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. एकनाथ शिंदे यांनी बरोबर वक्तव्य केलं आहे. त्यांनी जर 50 थरांची दहीहंडी फोडली नसती तर राज्यात सत्तांतरण झाले नसते, असा चिमटाही त्यांनी काढला.