टिपू सुलतान वादात आता सदावर्तेंची उडी, संजय राऊतांकडे केली मोठी मागणी, नेमकं काय म्हणाले?

टिपू सुलतान यांच्या जंयतीवरून सध्या राज्यात राजकारण चांगलंच तापलं आहे. यावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केंद्राने आपली भूमिका स्पष्ट करावी असं म्हटलं होतं, यावर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

टिपू सुलतान वादात आता सदावर्तेंची उडी, संजय राऊतांकडे केली मोठी मागणी, नेमकं काय म्हणाले?
gunratna sadavarte
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Nov 22, 2026 | 3:06 PM

टिपू सुलतान यांच्या जयंतीवरून राज्यात सध्या राजकारण चांगलंच तापलं आहे. हिंदुत्ववादी संघटनांकडून टिपू सुलतान यांना विरोध  होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं होतं. टिपू सुलतान हे वीर होते की देशाचे शत्रू? याबाबत केंद्र सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. दरम्यान सध्या महाराष्ट्रासह देशभरात अनेक समस्या आहेत, असं असताना फक्त राजकारणासाठी हा वाद किती काळ सुरू ठेवायचा? असा सवाल करतानाच या वादावर आता केंद्र सरकारने पडदा टाकावा अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान संजय राऊत यांच्या या मागणीवर आता ज्येष्ठ वकील गुणरत्न सदावर्ते यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला आहे.

नेमकं काय म्हणाले सदावर्ते? 

Loading...

नोंदीनुसार टिपू सुलतान यांनी अनेकांचे इस्लामात धर्मांतर केले. संविधानावर चालणारा देश म्हणून भारताची ओळख आहे. त्यामुळे आता टिपू सुलतान यांच्यावर तुमची भूमिका काय आहे? हे संजय राऊत यांनी स्पष्ट करावं? असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. दरम्यान टिपू सुलतान यांचे कार्य आणि विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज असल्याचं काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी म्हटलं होतं, यावरून देखील सदावर्ते यांनी देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित देशमुख यांचं कोणंतही राजकीय वलय नाही, ते वडिलांच्या राजकारणावर बोलणारे लोक आहेत, असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.

दरम्यान सध्या महाराष्ट्रात दुष्काळ आहे, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. मात्र तरी देखील सक्तीने कर्ज वसुली सुरूच आहे. खासगी फायनान्स संस्थांकडून सक्तीने कर्जाची वसुली केली जात आहे. यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना घडत आहेत. यावर देखील  यावेळी सदावर्ते यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सक्तीच्या वसुलीमुळे अनेक लोकांनी आपले जीवन संपवले आहे.  नांदेडच्या एका तरुणाने चिठ्ठी लिहीली आहे, की तो कर्जामुळे जीवन संपवत आहे. त्याने एका बँकेतून कर्ज घेतलं होतं. मात्र या प्रकरणात अद्याप एकाही बँक अधिकाऱ्याला अटक करण्यात आलेली नाहीये. या प्रकरणात नांदेडच्या पोलीस अधिक्षकांनी एसआयटी गठित करावी, अशी मागणी सदावर्ते यांनी केली आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us