हर्षवर्धन पाटलांची कन्या राजकारणात, पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर

| Updated on: Jun 05, 2019 | 6:25 PM

या निवडणुकीच्या निमित्ताने पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारण सक्रिय झाली आहे. अंकिता पाटील उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील.

हर्षवर्धन पाटलांची कन्या राजकारणात, पोटनिवडणुकीची उमेदवारी जाहीर
Follow us on

पुणे : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. जिल्हा परिषद गटासाठीच्या पोटनिवडणुकित काँग्रेसकडून अंकिता यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारण सक्रिय झाली आहे. अंकिता पाटील उद्या सकाळी 10 वाजता उमेदवारी अर्ज दाखल करतील.

अंकिता पाटील या सध्या इंडियन शुगर मिल्स असोसिएशन नवी दिल्लीच्या सदस्या आहेत. हर्षवर्धन पाटील यांचा सोशल मीडिया आणि शिक्षण संस्थांची जबाबदारी अंकिता पाटील यांच्याकडे आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या मातोश्री जिल्हा परिषद सदस्य होत्या. पण त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागी अंकिता पाटील यांना संधी देण्यात आली आहे.

पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात

अंकिता यांच्या रुपाने पाटील घराण्याची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झाली आहे. हर्धवर्धन पाटलांचे चुलते शंकरराव पाटील दोन वेळा बारामतीचे खासदार होते. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस वाढवण्यात त्यांनी मोठं योगदान दिलं. यानंतर हर्षवर्धन पाटील 1992 नंतर राजकारणात सक्रिय झाले. राज्य सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदही भूषवलं. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढलेल्या 2014 च्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटलांचा पराभव झाला.

VIDEO : “पार्थच्या पराभवाची जबाबदारी माझी”- अजित पवार TV9 वर EXCLUSIVE