AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amit Shah : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह येणार महाराष्ट्र दौऱ्यावर, काय घोषणा करणार?

केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) महाराष्ट्रा दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसांचा हा दौरा असणार आहे. यादरम्यान ते पुणे (Pune) आणि शिर्डी(Shirdi)ला भेट देतील. शरद पवार (Sharad Pawar) यांना मात्र राज्यातील सहकार परिषदेचं अद्याप निमंत्रण नाही, असं समजतंय.

Amit Shah : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह येणार महाराष्ट्र दौऱ्यावर, काय घोषणा करणार?
अमित शाह
| Edited By: Pradeep Garad | Updated on: Dec 14, 2021 | 9:06 PM
Share

नवी दिल्ली : सहकार परिषदेनिमित्त केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) महाराष्ट्रा दौऱ्यावर येणार आहेत. दोन दिवसांचा हा दौरा असणार आहे. यादरम्यान ते पुणे (Pune) आणि शिर्डी(Shirdi)ला भेट देतील.

साईंचं घेणार दर्शन 18 डिसेंबरला शाह शिर्डीत येणार आहेत. साईबाबां(Saibaba)चे दर्शन ते घेतील. त्यानंतर पहिल्या सहकार परिषदेला ते उपस्थित राहतील. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीसDevendra Fadnavis), केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांच्यासह भाजपा(BJP)चे विविध नेत आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तज्ज्ञ मंडळींचा सहभाग सहकाराची सुरूवात झालेल्या प्रवरा इथं देशाची पहिली सहकार परिषद होणार आहे तसंच विचारमंथनही होणार आहे. भाजपा आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe) आणि खासदार सुजय विखे-पाटील (Sujay Vikhe) यांनी या सहकार परिषदेचं आयोजन केलंय. सहकार क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी या परिषदेत सहभागी होणार आहे. सहकाराच्या स्थितीवर या परिषदेत चर्चा होणार आहे.

महत्त्वाच्या घोषणा करणार अमित शाह सहकार क्षेत्रासंदर्भात या परिषदेत काही महत्त्वाच्या घोषणा करणार का, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. राज्यात सहकारी कारखाना आणि भ्रष्टाचाराबाबत राजकीय क्षेत्रात आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच शाह यांचा हा दौरा आहे.

शरद पवारांना निमंत्रण नाही? राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि सहकार तज्ज्ञ शरद पवार (Sharad Pawar) यांना मात्र राज्यातील सहकार परिषदेचं अद्याप निमंत्रण नाही, असं समजतंय. परिषदेचे आयोजक आणि पवार कुटुंबीय यांच्यातील राजकीय संबंध तणावाचे आहेत. त्यामुळे त्यांना बोलावलं जाईल की नाही, याविषयी उत्सुकता आहे.

पुणे दौरा अमित शाह हे 19 डिसेंबरला पुणे दौरा करण्याची शक्यता आहे. त्यात पुण्यातील विकासकामांचं उद्घाटन ते करतील. त्यानंतर ते मेळावा घेण्याची शक्यता आहे. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनं शाहांच्या या राजकीय दौऱ्याकडे पाहिलं जात आहे.

Sharad Pawar : यूपीएचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पवारांच्या चेहऱ्यावर सहमती होतेय? ममता काय करणार?

बिपीन रावतांच्या मेव्हण्याच्या जमिनीवर मध्यप्रदेश सरकारचा बुलडोझर; सोशल मीडियावर टाकली पोस्ट

स्वाधार शिष्यवृत्ती, वसतिगृह प्रवेश व परदेश शिष्यवृत्ती प्रक्रिया आता ऑनलाईन होणार, विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?