प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता किती? उत्पन्नाचे साधन काय?

सोलापूर : भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला सोबत घेऊन, महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आणि लोकसभा निवडणुकीला ते समारे जात आहेत. महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागांवर वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार दिले आहेत. त्यापैकी अकोला आणि सोलापूर या दोन जागांवरुन स्वत: अॅड. प्रकाश आंबेडकर निवडणूक लढत …

prakash ambedkar, प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता किती? उत्पन्नाचे साधन काय?

सोलापूर : भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाला सोबत घेऊन, महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन केली आणि लोकसभा निवडणुकीला ते समारे जात आहेत. महाराष्ट्रातील 48 च्या 48 जागांवर वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार दिले आहेत. त्यापैकी अकोला आणि सोलापूर या दोन जागांवरुन स्वत: अॅड. प्रकाश आंबेडकर निवडणूक लढत आहेत. यावेळी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना, प्रतिज्ञापत्र सादर केले. यात त्यांनी त्यांचे उत्पन्न, मालमत्ता, कर्ज, शिक्षण, त्यांच्यावर दाखल गुन्हे इत्यादी सविस्तर माहिती निवडणूक आयोगासमोर सादर केली.

अॅड. प्रकाश आंबेडकर यांचं शिक्षण

प्रकाश आंबेडकर हे दहावीची परीक्षा 1972 साली उत्तीर्ण झाले. त्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमधून 1978 साली त्यांनी बीएचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर सिद्धार्थ कॉलेजमधूनच 1981 साली एलएलबीची पदवी मिळवली.

प्रकाश यशवंत आंबेडकर यांचं उत्पन्न

 • 2014-15 : 1 लाख 61 हजार 100 रुपये
 • 2015-16 : 3 लाख 8 हजार 580 रुपये
 • 2016-17 : 2 लाख 61 हजार 650 रुपये
 • 2017-18 : 4 लाख 15 हजार 525 रुपये
 • 2018-19 : 8 लाख 60 हजार 190 रुपये

अंजली आंबेडकर

 • 2014-15 : 12 लाख 95 हजार 60 रुपये
 • 2015-16 : 26 लाख 24 हजार रुपये
 • 2016-17 : 23 लाख 7 हजार 840 रुपये
 • 2017-18 : 20 लाख 5 हजार 530 रुपये
 • 2018-19 : 21 लाख 9 हजार 140 रुपये

prakash ambedkar, प्रकाश आंबेडकर यांची मालमत्ता किती? उत्पन्नाचे साधन काय?

जंगम मालमत्ता

 • प्रकाश आंबेडकर – 41 लाख 81 हजार 189 रुपये
 • अंजली आंबेडकर (पत्नी) – 73 लाख 86 हजार 273 रुपये
 • सुजात आंबेडकर (मुलगा) – 9 लाख 55 हजार 454 रुपये

स्थावर मालमत्ता

 • प्रकाश आंबेडकर – 32 लाख रुपये
 • अंजली आंबेडकर (पत्नी) – 1 कोटी 15 लाख रुपये
 • संयुक्त मालमत्ता – 3 कोटी 15 लाख रुपये

उत्पन्नाची साधने :

 • माजी खासदार असल्याने भारत सरकारची पेन्शन
 • वकिलीतून मिळालेले मानधन
 • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुस्तकांची रॉयल्टी
 • प्रबुद्ध भारत मीडिया हाऊस

प्रकाश आंबेडकर यांच्यावर कुठल्याही बँकेचं किंवा वित्त संस्थेचं कर्ज नाही. त्यांच्याकडे गाडी नसल्याचेही त्यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्यावर कोणत्याही प्रकारचा गुन्हेगारी प्रकारातील गुन्हा नाही.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *