राहुल गांधींची संपत्ती किती? मोदी सरकारच्या काळात कितीने वाढली?

तिरुअनंतपुरम : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं, ज्यातून राहुल गांधी यांची संपत्ती समोर आली. 14 कोटी 85 लाख रुपयांची एकूण संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांच्या काळात राहुल गांधींच्या संपत्तीत 4 कोटी 85 लाखांची वाढ झाली …

राहुल गांधींची संपत्ती किती? मोदी सरकारच्या काळात कितीने वाढली?

तिरुअनंतपुरम : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काल केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केलं, ज्यातून राहुल गांधी यांची संपत्ती समोर आली. 14 कोटी 85 लाख रुपयांची एकूण संपत्ती राहुल गांधी यांच्या नावावर आहे. विशेष म्हणजे, गेल्या पाच वर्षांच्या काळात राहुल गांधींच्या संपत्तीत 4 कोटी 85 लाखांची वाढ झाली आहे. 2014 साली अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल करताना राहुल गांधींनी जाहीर केलेली संपत्ती 10 कोटी रुपये एवढी होती.

  • जंगम मालमत्ता – 5 कोटी 80 लाख 58 हजार 799 रुपये
  • स्थावर मालमत्ता – 7 कोटी 73 लाख 3 हजार 977 रुपये

राहुल गांधी यांचं 2017-18 या वर्षाचं उत्पन्न 1 कोटी 11 लाख 85 हजार 570 रुपये एवढे आहे. त्यांनी आई सोनिया गांधी यांच्याकडून 5 लाख रुपयांचं कर्ज घेतलं आहे. तसेच, 72 लाख 1 हजार 904 रुपयांचे इतर कर्जही राहुल गांधी यांच्यावर आहे.

राहुल गांधी यांनी स्वत: खरेदी केलेली मालमत्ता 8 कोटी 7 लाख 58 हजार 265 रुपये आहे, तर विविध बँकांमध्ये 17 लाख 93 हजार 693 रुपयांचे डिपॉझिट्स आहेत.

2014 साली राहुल गांधी यांची जंगम मालमत्ता 8 कोटी 7 लाख 58 हजार 265 रुपये आणि स्थावर मालमत्ता 1 कोटी 32 लाख 48 हजार 284 रुपये आहे. शिवाय, 2012-13 चं वार्षिक उत्पन्न 92 लाख 46 हजार 973 रुपये होतं.

राहुल गांधींनी बाँड्स आणि शेअर्समध्ये 5 कोटी 19 लाख 44 हजार 682 रुपयांची गुंतवणूक केली आहे. तसेच, 39 लाख 89 हजार 37 रुपयांची पीपीएफ आणि पोस्टल सेव्हिंग्समध्ये गुंतवणूक आहे. 2 लाख 91 हजार 367 रुपयांचे दागिने राहुल गांधींकडे आहेत. या दागिन्यात 333.300 ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत.

राहुल गांधी आणि बहीण प्रियांका गांधी यांच्या नावावर नवी दिल्लीतील मेहरौलीत 2.34 एकर इतकी शेतजमीन आहे. गुरुग्राममधील सिलोखेरा येथे 5 हजार 838 स्केअर फूट कमर्शिल एरिया राहुल गांधींच्या नावावर असून, त्याची किंमत 8 कोटी 75 लाख 70 हजार रुपये आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *