झारखंड विधानसभा निवडणुकीत अनोखी टशन, नवरा-बायको एकमेकांविरोधात मैदानात!

झारखंड विधानसभा निवडणुकीत एका दाम्पत्याची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरु आहे. भवनाथपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून नवरा-बायको एकमेकांविरोधात निवडणूक (husband-wife zharkhand election) रिंगणात उतरले आहेत.

झारखंड विधानसभा निवडणुकीत अनोखी टशन, नवरा-बायको एकमेकांविरोधात मैदानात!

रांची : झारखंड विधानसभा निवडणुकीत एका दाम्पत्याची चर्चा संपूर्ण राज्यभर सुरु आहे. भवनाथपूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार म्हणून नवरा-बायको एकमेकांविरोधात निवडणूक (husband-wife zharkhand election) रिंगणात उतरले आहेत. मनीष कुमार आणि प्रियांका सिंह असं या दाम्पत्याचे (husband-wife zharkhand election) नाव आहे.

विधानसभा निवडणुकीत राज्यात पहिल्यांदाच नवरा-बायको एकमेकांविरोधात उभे राहिल्याने सर्वत्र त्यांचीच चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे निवडणूक फॉर्म भरण्यासाठी हे दोघे एकाच कारमधून आले होते. ते दोघे निवडणूक प्रचारही एकत्र करत आहेत.

निवडणूक आयोगाकडे जमा केलेल्या कागदपत्रानुसार प्रियांका आणि मनीष यांच्याविरोधात एकही गुन्हा दाखल नाही. दोघांकडे एकूण रोख रक्कम आठ लाख रुपये आणि जवळपास चार लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. तसेच त्यांच्याकडे काही शेतजमीन आहे. प्रियंका बीएड पदवीधर आहे, तर मनीष ग्रॅज्युएट आहे. तसेच दोघंही शेती व्यवसाय करतात.

“आम्ही दोघे एकमेकांविरोधात निवडणूक नक्की लढवत आहे. पण एकमेकांना हरवण्यासाठी नाही, तर समाजाच्या सेवेसाठी आम्ही मतदान मागत आहे. आम्ही दोघे एकत्र निवडणूक प्रचार करत आहे”, असं या दाम्पत्याचं म्हणणं आहे.

झरिया मतदारसंघात दोन सुना एकमेकांविरोधात निवडणूक रिंगणात

धनबादच्या झरिया विधानसभा मतदारसंघात बाहुबली सुरजदेव सिंह यांचे वर्चस्व आहे. सध्या भाजपचे संजीव सिंह येथे आमदार आहेत. संजीव आपल्या काकाच्या मुलाच्या खून झाल्याच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. भाजपने संजीव यांची पत्नी रागिनी सिंह यांना तिकीट दिले आहे. तर काँग्रेसने नीरज सिंह यांची पत्नी पूर्णिमा सिंह यांना निवडणूक मैदानात उतरवले आहे.

धनबाद येथे निवडणूक रिंगणात जावा-जावा एकमेकांच्या विरोधात लढत असल्यामुळे सर्वांचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. तसेच बुधवारी (13 नोव्हेंबर) संजीवलाही जेलमधून निवडणूक लढवण्याची परवानगी न्यायालयाने दिली. त्यामुळे संजीव भाजपकडून निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *