काल माजी राज्यमंत्र्याने शिवसेना सोडली, आता चार टर्म आमदार पक्षावर नाराज

गजानन उमाटे

| Edited By: |

Updated on: Jul 14, 2021 | 10:28 AM

विदर्भात आधीच चौथ्या नंबरवर असलेल्या शिवसेनेला आता मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. (Shiv Sena MLA Ashish Jaiswal ) आशिष जैसवाल हे नागपूरमधील रामटेक (Ramtek) या मतदारसंघाचे आमदार आहेत.

काल माजी राज्यमंत्र्याने शिवसेना सोडली, आता चार टर्म आमदार पक्षावर नाराज
Shiv Sena MLA Ashish Jaiswal Ramtek
Follow us

नागपूर : शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे (Ashok Shinde) यांनी काल राजीनामा दिल्यानंतर, आता विदर्भातील सेनेचा आणखी एक मोठा नेता आणि चार टर्मचे आमदार आशिष जैसवाल (Shiv Sena MLA Ashish Jaiswal) पक्षावर नाराज असल्याची माहिती आहे. त्यामुळे विदर्भात आधीच चौथ्या नंबरवर असलेल्या शिवसेनेला आता मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. आशिष जैसवाल हे नागपूरमधील रामटेक (Ramtek) या मतदारसंघाचे आमदार आहेत.

“30 वर्षे शिवसेनेत काम केलंय पण सन्मान नाही, बाहेरच्यांना मंत्रिपदं मिळतात, पण प्रामाणिक शिवसैनिकांना न्याय नाही. त्यामुळे मनात दुःख आहे, वेदना आहेत” असं म्हणत आ. आशिष जैसवाल यांनी आपली नाराजी व्यक्त केली. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.

संधी मिळत नसल्याने कार्यकर्ते नाराज असल्याचंही जैसवाल म्हणाले. विदर्भात शिवसेनेचा सध्या एकही मंत्री नाही, मग पक्ष कसा वाढणार? असा सवालही आशिष जैसवाल यांनी उपस्थित केला आहे.

अशोक शिंदे यांचा जय महाराष्ट्र

शिवसेनेचे उपनेते आणि माजी राज्यमंत्री काँग्रेसच्या वाटेवर आहेत. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार अशोक शिंदे (Ashok Shinde) हे काँग्रेसचा झेंडा हाती धरत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत शिंदे काँग्रेसचा झेंडा हाती धरतील. अशोक शिंदे हे हिंगणघाट मतदारसंघातून तीन वेळा आमदार राहिले आहेत. माजी राज्यमंत्री असलेल्या शिंदेंकडे सध्या शिवसेनेचे उपनेतेपद आहे. 1995 मध्ये शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार झाले होते. मात्र पक्षाकडून मागील काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर डावलले गेल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा होती.

सुरेश म्हात्रेंचाही शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश 

ठाण्यातील शिवसेना नेते सुरेश (बाळा मामा) म्हात्रे (Suresh Balya Mama Mhatre) काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या उपस्थितीत म्हात्रे मुंबईत काँग्रेसचा झेंडा हाती धरतील. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना त्यानंतर आता काँग्रेस असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.

VIDEO : आशिष जैसवाल एक्स्क्लुझिव्ह

संबंधित बातम्या  

शिवसेनेला धक्का, माजी राज्यमंत्री शिवबंधन सोडून पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये

शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्ये, अशोक शिंदेंसह बाळ्या मामा म्हात्रेंचेही पक्षांतर

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI