AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या मैत्रीने कार्यकर्ते पुन्हा गोंधळले

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं. शिवाय त्यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचं सांगितलं. पण ज्या काँग्रेसने शरद पवार यांचा अपमान केला, त्याच काँग्रेससोबत ते परत गेल्याचं वाईट वाटतं, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, नंदुरबार, नांदेड, गडचिरोली इथल्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]

शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या मैत्रीने कार्यकर्ते पुन्हा गोंधळले
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:35 PM
Share

बारामती : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं कौतुक केलं. शिवाय त्यांच्याबद्दल आपल्याला आदर असल्याचं सांगितलं. पण ज्या काँग्रेसने शरद पवार यांचा अपमान केला, त्याच काँग्रेससोबत ते परत गेल्याचं वाईट वाटतं, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बारामतीसह हिंगोली, नंदुरबार, नांदेड, गडचिरोली इथल्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार बाळा भेगडे, खडकवासल्याचे भाजप आमदार भिमराव तापकीर, रासपचे आमदार राहुल कुल यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शरद पवार यांच्याबद्दल आपल्याला व्यक्तिगत आदर आहे. ते देशातील मोठे नेते आहेत. मात्र काँग्रेसने त्यांना वेळोवेळी अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळेच त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. अध्यक्षपदावेळी काँग्रेसने त्यांचा अपमान करत त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला. ज्या काँग्रेसने त्यांना पक्षाबरोबर ठेवलं नाही, त्याच काँग्रेससोबत आज पवारसाहेब पुन्हा गेले याची खंत वाटत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय.

या निमित्ताने नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले. दरम्यान, लाईव्ह संवाद साधताना नरेंद्र मोदी पवारांना टार्गेट करतील अशी अपेक्षा असतानाच त्यांनी पवारांचं कौतुक केल्याने कार्यकर्त्यांचा मात्र भ्रमनिरास झाला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संवादाची सुरुवात मराठीतून केली. सुरुवातीलाच त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन करत त्यांच्या कार्याचं कौतुक केलं. याचवेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना देश काँग्रेसमुक्त करण्याचा पुनरुच्चार केला. देशाला काँग्रेसपासून मुक्त करण्यासाठी कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागलं पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या बूथ कार्यकर्त्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचं सांगितलं. त्याचवेळी पवारांचं कौतुक आणि काँग्रेसवर निषाणा साधत त्यांनी एकाच दगडात दोन पक्षी मारल्याचीही चर्चा कार्यकर्त्यांमध्ये होऊ लागली आहे.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा