Video| …तर राजकारण सोडेन, राऊतांनी निर्वाणीची भाषा का वापरली?

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपावर जोरदार हल्ला चढवला आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

Video| ...तर राजकारण सोडेन, राऊतांनी निर्वाणीची भाषा का वापरली?
संजय राऊत
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 5:14 PM

मुंबई : शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आज पत्रकार परिषद (Press conference) घेत भाजपावर (BJP) जोरदार हल्ला चढवला आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. गेल्या काही दिवसांपासून किरीट सोमय्या यांच्याकडून महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर सातत्याने भ्रष्टचाराचे आरोप होत आहेत. तसेच काही जणांची तर इडीकडून चौकशीला देखील सुरुवात झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत या सर्व आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी बोलताना राऊत यांनी म्हटले आहे की, दलाल ज्याला आपण भXX म्हणतो. त्यानं म्हटलंय की ठाकरे कुटुंबीयांनी कोर्लाई गावात 19 बंगले बांधून ठेवले आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे. माझे त्या माणसाला आव्हान आहे की, आपण त्या 19 बंगल्यावर पिकनिकला जाऊ जर तुम्हाला ते बंगले तिथे दिसते तर मी राजकारण सोडेल. आणि ते बंगले तिथे नसले तर तुम्हील त्या दलाला जोड्याने मारा, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

संजय राऊत यांनी नेमके काय म्हटले?

संजय राऊत यांनी या पत्रकार परिषदेमध्ये भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. दलाल ज्याला आपण भXX म्हणतो. त्याने ठाकरे कुटुंबीयांवर आरोप केला आहे की, कोर्लाई गावात ठाकरे कुटुबींयांनी 19 बंगले बांधून ठेवले आहेत. ही बेनामी प्रॉपर्टी आहे. माझं आव्हान आहे की,  कधीही सांगा आपण चार बस करून संबंधित ठिकाणी पिकनिकसाठी जाऊ. तिथे जर 19 बंगले दिसले तर मी राजकारण सोडतो आणि तिथे जर बंगले नसले तर त्या दलालाल जोड्याने मारा. म्हणजे पुढच्यावेळी दिशाभूल करण्याची हिंमत होणार नाही. किरीट सोमय्या यांचे नाव न घेता संजय राऊत यांनी सोमय्यांना जोरदा टोला लगावला आहे.

‘मराठी भाषेच्या विरोधात कोर्टत गेले ‘

दरम्यान यावेळी बोलताना संजय राऊत यांनी मराठी भाषेवरून देखील किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली. हा भxx मराठी भाषेच्या विरोधात कोर्टात गेला. शाळेतील अभ्यासक्रमात मराठी भाष सक्तीची नको अशी मागणी त्याने कोर्टात केली होती. त्याचे थोबड आधी बंद करा नाही तर आम्ही करू असा इशारा देखील संजय राऊत यांनी यावेळी दिला आहे. या पत्रकार परिषदेमध्ये विविध मुद्द्यांवरून राऊत यांनी सोमय्या आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे.

संबंधित बातम्या

Sanjay Raut Press Conference : पीएमसी घोटाळ्याच्या मास्टरमाईंडशी सोमय्यांचे थेट संबंध, राऊत म्हणाले, पुराव्यानिशी सांगतोय, पूर्ण क्रोनोलॉजी सांगितली

Sanjay Raut: किरीट आणि निल सोमय्यांना अटक करा, राऊतांची मागणी, नेमके आरोप काय?

ठाकरे सरकार पाडण्यासाठी नेमकं कोण भेटलं? कोण ‘टाईट’ करतंय? पहिल्यांदाच राऊतांनी फोडून सांगितलं?

Non Stop LIVE Update
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर
मुंबईत आज 2 मोठ्या जाहीर सभा, दिग्गज नेते दिसणार एकाच मंचावर.
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?
अजितदादा महायुतीच्या प्रचारातून गायब? पुन्हा राजकीय भूकंपाचे संकेत?.
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट
युती तुटली, तेव्हा मातोश्रीत नेमकं काय घडलं? उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट.
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा
बाळासाहेबांच्या खोलीत नेमकी काय चर्चा झाली? उद्धव ठाकरेंचा मोठा खुलासा.
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर
'आताही बॅगा घेऊन आलोय', राऊतांच्या आरोपावर एकनाथ शिंदेंचं उत्तर.
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी
मोठी बातमी : नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी.
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार
Monsoon Update:नागरिकांची उकाड्यापासून सुटका, यंदा मान्सून लवकर धडकणार.
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत
पैसा फेको तमाशा देखो हाच शिंदे गटाचा जाहीरनामा : संजय राऊत.
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले...
मोदींच्या कांदा प्रश्नावर शरद पवार यांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले....
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो
मोदींनी भर सभेत शिंदेंना उठवलं आणि म्हणाले, तुम्ही जा, मी इथे सांभाळतो.