Rahul Narvekar : सासऱ्यांपेक्षाही चांगलं काम करून दाखवणार, नार्वेकरांचा दावा; पहिल्यांदाच परिषदेत सभापतीपदी सासरे, विधानसभेत अध्यक्षपदी जावई दिसणार?

विधानसभा अध्यक्ष पद म्हणजे मोठी जबाबदारी आहे. एका पक्षात काम करणे सोपे पण या पदावरील व्यक्तीला सर्वांनाच समावून घेऊन काम करावे लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभेला मोठी परंपरा आहे. ती कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न तर करावेच लागणार आहे पण कुणाचे मन दुखवणार नाही शिवाय निर्णयाचा परिणाम विकास कामावर होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

Rahul Narvekar : सासऱ्यांपेक्षाही चांगलं काम करून दाखवणार, नार्वेकरांचा दावा; पहिल्यांदाच परिषदेत सभापतीपदी सासरे, विधानसभेत अध्यक्षपदी जावई दिसणार?
विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर आणि राहुल नार्वेकर
Follow us
| Updated on: Jul 02, 2022 | 2:19 PM

मुंबई :  (Maharashtra Politics) राज्यातील राजकीय नाट्यानंतर नेत्यांमधील मतभेद आणखी वाढले असतील. पण (Assembly Speaker) विधानसभा अध्यक्ष आणि (Legislative Council Speaker ) विधानपरिषदेचे सभापतीपदी जावाई आणि सासरे राहणार असल्याचे चित्र आहे. कारण भाजप तर्फे विधानसभा अध्यक्ष पदासाठी राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे. तर दुसरीकडे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत. शिवाय बहुमताचे संख्याबळ असल्यामुळे (Rahul Narvekar) राहुल नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे. एका सभागृहात सासऱ्याची कार्यशैली समोर येणार आहे तर विधानसभेच्या माध्यमातून नवख्या असणाऱ्या राहुल नार्वेकरांना आपल्या कामाची चुणूक दाखवण्याची संधी आहे. असे असले तरी विधान परिषदेपेक्षा विधानसभेचे कामकाज चालवणं जास्त आव्हानात्मक आहे. पण सासऱ्यांच्या अनुभवाचा फायदा आपल्याला करुन घेता येईल असे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे.

जबाबदारीचं ओझं पण सहकार्यातून पेलणार

विधानसभा अध्यक्ष पद म्हणजे मोठी जबाबदारी आहे. एका पक्षात काम करणे सोपे पण या पदावरील व्यक्तीला सर्वांनाच समावून घेऊन काम करावे लागणार आहे. महाराष्ट्र विधानसभेला मोठी परंपरा आहे. ती कायम ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न तर करावेच लागणार आहे पण कुणाचे मन दुखवणार नाही शिवाय निर्णयाचा परिणाम विकास कामावर होणार नाही याची देखील काळजी घ्यावी लागणार असल्याचे राहुल नार्वेकर यांनी सांगितले आहे. सर्व सदस्यांच्या सहकार्यातूनच हे शक्य होणार आहे. त्यामुळे विकासकामे आणि पक्ष मतभेदावरुन होणारे वादंग हे मिटवून घेण्यासाठीही आपले सर्वस्व पणाला लावावे लागणार असल्याचे नार्वेकर यांनी त्या पदावर बसण्यापूर्वीच स्पष्ट केले आहे.

सासऱ्यांच्या अनुभवाचा होईल फायदा

विधिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच विधान परिषदेत च्या सभापती पदी सासरे आणि विधानसभा अध्यक्ष पदावर जावई पाहायला मिळणार आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदी रामराजे नाईक निंबाळकर हे आहेत. जे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत. पण सासऱ्यांचा कामातील अनुभवचा फायदा आपल्याला होईल असा आशावाद राहुल नार्वेकर यांना आहे. शिवाय सर्व सदस्यांच्या सहकार्यातूनच चांगले काम घडणार आहे. यातूनच सभागृहाचे महत्व आणि परंपरा जोपासली जाणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

हे सुद्धा वाचा

विधान परिषदेपेक्षा आव्हान मोठे

आपल्याला कामकाजामध्ये सासऱ्यांच्या अनुभवाचा फायदा होईल पण त्यापेक्षा विधानसभा हे मोठे सभागृह आहे. त्यामुळे सर्व कसब पणाला लावून काम करावे लागणार आहे. अध्यक्ष पद असल्यामुळे आपल्या एका निर्णयाचा परिणाम मतदार संघातील विकास कामावर होणार नाही याची काळजी घेतली जाणार असल्याचेही नार्वेकर म्हणाले आहेत. असे असले तरी वरच्या सभागृहात सासरे आणि खालच्या सभागृहात जावाईबापूंचा कारभार राज्याला पाहता येणार आहे.

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.