“हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण?” चंद्रकांत खैरे आक्रमक; जलील म्हणतात “एका अटीवर आंदोलन मागे घेऊ”

| Updated on: Sep 01, 2020 | 5:24 PM

राज्यातील सर्व मंदिरं उघडा या मागणीसाठी एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत (Imtiaz jaleel and Chandrakant Khaire on open temple).

हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण? चंद्रकांत खैरे आक्रमक; जलील म्हणतात एका अटीवर आंदोलन मागे घेऊ
Follow us on

औरंगाबाद : राज्यातील सर्व मंदिरं उघडा या मागणीसाठी एमआयएमचे नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील आक्रमक झाले आहेत. यासाठी इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारविरोधात आंदोलन पुकारलं आहे. मात्र, त्यांच्या या भूमिकेला शिवसेनेचे नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी विरोध केला आहे. “हिंदू मंदिरं उघडा सांगणारे तुम्ही कोण?”, असा थेट सवाल त्यांनी इम्तियाज जलील यांना विचारला आहे (Imtiaz jaleel and Chandrakant Khaire on open temple).

मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर औरंगाबादचे आजी-माजी खासदार आमनेसामने आले आहेत. या दोघी आजी-माजी खासदारांची ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी आपापले मतं मांडली. यावेळी इम्तियाज जलील यांनी एका अटीवर आंदोलन मागे घेऊ, असं चंद्रकांत खैरे यांना सांगितलं (Imtiaz jaleel and Chandrakant Khaire on open temple).

चंद्रकांत खैरे आणि इम्तियाज जलील काय म्हणाले?

चंद्रकांत खैरे – आमच्या मंदिरात एमआयएमचे लोक येत असतील तर आम्ही गप्प बसायचं का? मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमने आंदोलन करुच नये. मुख्यमंत्र्यांनी मंदिरं आठ-दहा दिवसात सुरु करणार असं सांगितलं आहे.

इम्तियाज जलील – माझ्या पक्षाचे अध्यक्ष असुदुद्दीन ओवेसी आहेत. चंद्रकांत खैरे यांच्या आदेशावरुन मी आंदोलन करत नाही. मी आंदोलन करु नये, असं चंद्रकांत खैरे सांगत असतील, तर मी त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. माझा वेगळा पक्ष आहे. चंद्रकांत खैरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगावं. त्यांनी आपल्या पक्षप्रमुखांना सांगावं की, आता खूप वेळ झाली आहे. लोक आता रस्त्यावर येत आहेत. लोकांसमोर जायला आम्हाला खूप त्रास होत आहे. लोक आम्हाला प्रश्न विचारत आहेत. त्यामुळे आपण सर्व सुरु केले आहेत. तर फक्त मंदिरं का बंद ठेवले आहेत? हे मुख्यमंत्र्यांना सांगा.

इम्तियाज जलील – 20 वर्षे मंदिराचा मुद्दा धरुन ठेवला आणि सत्ता आल्यावर देवाला विसरुन जायचं? पण मंदिरात जाणारे श्रद्धाळू भाविक माझ्याजवळ येऊन मंदिर उघडण्याबाबत सांगतात. सरकार झोपलेले आहे. त्यामुळे नाईलाजाने मला रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे.

चंद्रकांत खैरे – इम्तियाज जलील म्हणतात, मी मुख्यमंत्र्यांना निर्देश द्यावे. मी मुख्यमंत्र्यांचा शिवसैनिक आहे. मी त्यांना याआधी मंदिरं उघडण्यासाठी विनंती केली होती. पण सध्या कोरोनाची राज्यात भयानक परिस्थिती आहे. सर्व लढत आहेत. मुख्यमंत्र्यांनी मंदिरं लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जलील यांच्यासोबत तीन-चार वेळा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली आहे. जलील यांनी सांगितलेल्या समस्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलेल्या आहेत.

चंद्रकांत खैरे – मी 1990 साली पहिला हिंदू खासदार निवडून आलो. मी एकही दंगल होऊ दिली नाही. पण हे निवडून आल्यापासून दंगत होत आहेत. आम्ही लोकांची सेवा केली. जलील फक्त राजकारण करतात.

इम्तियाज जलील – सरकार मंदिरामध्ये कमीत कमी 25 जणांना परवानगी देत असतील तर आम्ही आंदोलन मागे घेऊ. पण आता मंदिरावर लॉक आम्ही सहन करणार नाहीत. त्याचबरोबर बुद्ध विहार, मशिदीवर टाळे आम्ही सहन करणार नाहीत. खैरे साहेब तुम्हीही आमच्यासोबत या. तुम्ही आले तर आपण सरकारवर खूप मोठा प्रेशर टाकू.

चंद्रकांत खैरे – सरकारनर प्रेशर टाकण्याची गरज नाही. मुख्यमंत्री जनतेसाठी करत आहेत. मात्र, हे राजकारण करत आहेत.

इम्तियाज जलील – मी माझं आंदोलन मागे घेत आहे. राज्य सरकारने मंदिराबाहेर बसणारे फुलवाले, नारळवाले, अगरबत्ती आणि इतर पूजा साहित्य विक्री करणाऱ्यांसाठी प्रत्येकी दहा हजारांच पॅकेज जाहीर करावं. मी आंदोलन मागे घेतो.

चंद्रकांत खैरे – सर्वकाही होईल.

इम्तियाज जलील – तुम्ही घोषित करा. मी आंदोलन मागे घेतो.

चंद्रकांत खैरे – तुम्ही आंदोलन मागे घ्या किंवा नका घेऊ. तो तुमचा प्रश्न आहे. मुख्यमंत्री आठ ते दहा दिवसात मंदिर सुरु करतील. आमच्या मंदिरांची आणि मंदिरासमोर बसणाऱ्या फुलवाल्यांची काळजी करु नका. तुम्ही मशिदीबाहेर बसणाऱ्यांची काळजी करा.

इम्तियाज जलील – खैरे साहेब लोकप्रतिनिधी सर्व धर्मांसाठी कामं करतात. मी हिंदू, मुस्लिम, दलित आणि शिखांचाही आहे.

चंद्रकांत खैरे आणखी काय म्हणाले?

हिंदूंचे मंदिरं उघडा म्हणणारे हे कोण आहेत? यांचा काहीच संबंध नाही. आम्ही समर्थ आहोत. खरंतर श्रावण महिन्यात मंदिर उघडा ही मागणी मी स्वत: केली होती. मात्र काही अडचणी येत असतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशांचे आम्ही पालन करु, असंदेखील मी स्पष्ट केलं होतं.

सध्या कोरोनाचा संसर्ग जास्त वाढत आहे. मंदिरात गेल्यानंतर संसर्ग आणखी वाढू शकतो. त्यामुळे मंदिर उघडल्याने कोरोनाचा संसर्ग वाढला, असा राज्य सरकारवर आरोप होईल. मुख्यमंत्र्यांनी संयमीपणे सांगितलंय की, लॉकडाऊन आता हळूहळू उघडू. इम्तियाज जलील यांना माहिती आहे की, आता मंदिरं उघडतील. पण त्याच्याआधीच मंदिर उघडण्यासाठी आंदोलन करावं, असं त्यांना वाटलं.

हिंदूंचा आणि तुमचा काय संबंध? तुम्ही हिंदूंचे काही कामं करतात का? उलट जे मुस्लिम बांधव माझ्याकडे येतात मी त्यांचे कामं करतो. आमचे मंदिर उघडून कोरोनाचा संसर्ग झाला पाहिजे, असा त्यांचा मुख्य उद्देश आहे. हा त्यांचा प्रामानिक उद्देश नाही. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही गणेशोत्सव साजरा केला. पण जातीतणाव निर्माण व्हावा, दंगली व्हाव्यात असं त्यांचं मत आहे. पण मी कधीही सहन करणार नाही.

मांसाहार खाणाऱ्यांच्या हाताने आम्ही मंदिरं उघडू? हे आम्ही मान्य करु? आम्ही समर्थ आहोत. जातीदंगल व्हावी, हाच इम्तियाज जलील यांचा उद्देश आहे. पण ते आम्ही सहन करणार नाहीत. शिवसेना समर्थ आहे. आता परत त्यांनी सांगितलंय, दोन दिवसांनी परत येऊ. येऊन पाहा आमचे सर्व शिवसैनिक तिथे बसलेले असतील.

गावातील वातावरण गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीचं नाही. मात्र, गणेश विसर्जनाच्या दिवशी वातावरण खराब करायचा, हा ध्येय योग्य नाही. मी 1990 मध्ये शिवसेनेचा पहिला हिंदू आमदार झालो. त्यानंतर आतापर्यंत एकाही ठिकाणी मी जातीय दंगल होऊ दिली नाही. पण इम्तियाज जलील आल्यापासून दंगली सुरु झाल्या आहेत. आम्ही सर्वधर्मीयांना संरक्षण देतो.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रचंड अभ्यास करत आहेत. लोकांना मदत करत आहेत. तरीसुद्धा कुणीतरी शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहे. हे आम्ही सहन करणार नाहीत.

मंदिरं आठ-दहा दिवसात सुरु करु, असं सांगितलं आहे. मग इतकी घाई कशाला? हे आंदोलन करतात, ते आंदोलन करतात. कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळणं जरुरीचं आहे. मुख्यमंत्री प्रचंड मेहनत करत आहेत. पण आंदोलन करुन लोकं जमा केलं जात आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवलं जात नाही.

पुढे औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आहे. त्यामुळे राजकीय फायद्यासाठी इम्तियाज जलील यांचे सर्व प्रयत्न सुरु आहेत. त्यांना असं वाटतं की, असं केल्याने आपण हिंदूंची मतं घेऊ. हिंदूंचे काय मतं घेणार? ते निवडून आल्यानंतर काय चाललंय ते हिंदूंना पूर्ण कळलंय. आता हिंदू पूर्णपणे जागृत झाले आहेत. सर्वजण शिवसेनेच्या पाठीमागे आहेत.

प्रकाश आंबेडकर वारकऱ्यांना पांडुरंगाच्या मंदिरात घेऊन गेले होते. आता इथे एमआयएमचे लोक येत असतील तर आम्ही गप्प बसायचं का? मंदिरं उघडण्यासाठी एमआयएमचे आंदोलन करुच नये. मुख्यमंत्र्यांनी आठ-दहा दिवसात सुरु करणार असं सांगितलं आहे.

संबंधित बातम्या :

मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक, औरंगाबादेत मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार

‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन