मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर शिवसेना-एमआयएम आमनेसामने, हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही, जलील यांचे खैरेंना उत्तर

हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये (Imtiyaz Jaleel on Chandrakant Khaire)

मंदिर उघडण्याच्या मुद्द्यावर शिवसेना-एमआयएम आमनेसामने, हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही, जलील यांचे खैरेंना उत्तर
Follow us
| Updated on: Sep 01, 2020 | 3:12 PM

औरंगाबाद : “हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये (Imtiyaz Jaleel on Chandrakant Khaire), असे उत्तर एमआयएमचे औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना दिले आहे. नुकतेच खैरे यांनी जलील यांच्यां मंदिर उघडण्याच्या मोहिमेवर टीका केली होती. खैरे म्हणाले, “मी इथेच उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहू. आम्ही मंदिर उघडण्यासाठी समर्थ आहोत.” खैरेंच्या या टीकेवर जलील यांनीही आता उत्तर दिले आहे.

“हिंदू धर्माचा कुणीही ठेकेदार नाही. हिंदू मंदिरे आणि धर्माला कुणीही आपली मक्तेदारी समजू नये. ज्यांना धर्माच्या नावाने राजकारण करायचं आहे ते लोक असा वाद घालतात. मी जनतेचा खासदार आहे जनतेचे प्रश्न सोडवणार. मी मंदिरात गेलो तरी मंदिराचे पूर्ण पावित्र्य राखणार. तिथे माझ्या सोबत हिंदू बांधवही असणार आहेत”, असं इम्तियाज जलील यांनी सांगितले.

एमआयएमने मंदिरं उघडण्यासाठी सुरु केलेल्या मोहिमेतंर्गत पुजाऱ्यांना निवेदन दिले जाणार आहे. औरंगाबादमधील प्रसिद्ध खडकेश्वर मंदिरातील पुजाऱ्यांची एमआयएम भेट घेणार आहे. निवेदन देऊन मंदिर उघडण्याची विनंती करणार आहे. तर मशिदी उघडण्याची एमआयएमची मोहीम सुरु होणार आहे.

“राज्य सरकारने एक सप्टेंबरपासून मंदिरं उघडावीत, आम्ही दोन तारखेला सर्व मशिदी उघडू”, असे अल्टिमेटम एमआयएम नेते आणि औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विटरवरुन 27 ऑगस्टला ठाकरे सरकारला दिले होते.

चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?

“मी इथेच उभा आहे. मंदिर कसं उघडतं ते पाहू. आम्ही मंदिर उघडण्यासाठी समर्थ आहोत. मी अभिषेकही केला आहे. पण मंदिर उघडे करा हे इम्तियाज जलील कोण बोलणारे? हे सर्व राजकारण आहे. त्यांना राजकारण करायचं आहे. शिवसेनेने हिंदुत्वाची भूमिका सोडली असं त्यांना दाखवायचं आहे. त्यांचा शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव आहे. ते आम्ही सहन करणार नाही, असं चंद्रकांत खैरे म्हणाले.

दोन दिवसानंतरही ही मंदिरांसमोर उभा राहिल. येऊन दाखव. मंदिरं सुरु करा, अशी माझी मागणी होती. मात्र, मुख्यमंत्र्यांचा आदेश असेल तर ते आम्ही पाळू. संपला विषय, असंही खैरे यांनी सांगितले.

खैरे म्हणाले, “दोन दिवसानंतर काय? आम्ही इथेच आहोत सगळे. इथे आता सगळे शिवसैनिक बसतील. जलील मंदिर उघडणारे कोण? आम्ही उघडू मंदिर. मुख्यमंत्री आदेश देतील तेव्हा आम्ही उघडू मंदिर. मुख्यमंत्री मंदिर उघडणार आहेत. मात्र, मुद्दाम राजकारण कशाला करायचं?”

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरं खुली करावी या मागणीसाठी काल पंढरपूर येथे आंदोलन केलं होतं. मोजक्या कार्यकर्त्यांसह त्यांनी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश केला. यावेळी त्यांनी उपस्थित वारकऱ्यांना आणि नागरिकांना आजपासून मंदिरं खुली आहेत असं समजून दर्शन घेण्याचं आवाहन केलं.

संबंधित बातम्या :

मंदिरं उघडण्यासाठी एमआयएम आक्रमक, औरंगाबादेत मंदिराच्या पुजाऱ्यांना निवेदन देणार

‘आजपासून मंदिरं खुली झाली असं समजा’, प्रकाश आंबेडकरांचं विठ्ठल मंदिरात प्रवेश करत आंदोलन

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.