... तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी भूमिका घेतली आहे.

Imtiyaz Jaleel on renaming Aurangabad as Sambhajinagar, … तर मी स्वतः औरंगाबादला संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन : इम्तियाज जलील

औरंगाबाद : एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मोठी भूमिका घेतली आहे (Imtiyaz Jaleel on renaming Aurangabad as Sambhajinagar). त्यांनी मनसे आणि शिवसेनेला आधी शहराच्या विकासावर लक्ष देण्याचा सल्ला दिला. ते म्हणाले, “संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. आधी पुढील 4 वर्षात शहराचा विकास करा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्या. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ.”

इम्तियाज जलील म्हणाले, “औरंगाबादमधील लोकांना, इथल्या कट्टर शिवसैनिकांना विचारा नाव बदलायचं की विकास करायचा. संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. मात्र, त्यांनी आधी पुढील 4 वर्षांमध्ये शहराचा विकास करावा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्यावा. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ. तुम्ही जर कचरामुक्त शहर केलं, तर मी स्वत: संभाजीनगर नाव द्यायला पुढाकार घेईन. फक्त नाव बदलून तुम्ही काय साध्य करणार आहात?”

मी 32 वर्षांपासून ऐकत आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार आहे. निवडणुका जशा जशा येतात तसे हे मुद्दे उपस्थित केले जातात. आता महानगर पालिकेची निवडणूक येत आहे. त्यामुळेच नामांतराची पुन्हा मागणी होणार हे 200 टक्के माहिती होतं. कचरा, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे आहेत, पण यावर तुम्ही बोलणार नाही. ज्यांना काही कामं उरली नाहीत तेच असे मुद्दे उपस्थित करतात, असं म्हणत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

“हा लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न”

इम्तियाज जलील म्हणाले, “शहराचं नाव बदलण्याची मागणी लोकांमध्ये आणि समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. बाळासाहेब ठाकरे असते, तर ते माझ्या नावानं स्मारक बांधू नका, तर मोठं हॉस्पिटल बांधा, असं म्हणाले असते. भावनिक मुद्दे तयार करुन हे राजकारण करत आहेत. खैरेंना काही काम उरलेलं नाही. म्हणून ते हे मुद्दे पुढे करत आहेत. तुमच्या हातात सत्ता आहे. त्यामुळं तुम्हाला जे करायचे ते करा.”

संबंधित व्हिडीओ :


Imtiyaz Jaleel on renaming Aurangabad as Sambhajinagar

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *