AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इम्तियाज जलील शांतीगिरी महाराजांची भेट घेणार, हिंदू मतांसाठी नवी खेळी?

औरंगाबाद : एमआयएमचे विद्यमान आमदार आणि औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार इम्तियाज जलील हे वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांची भेट घेणार आहेत. 13 तारखेला ही भेट निश्चित झाल्याची माहिती आहे. शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील हिंदू धर्मियांचं मोठं शक्ती स्थान आहेत. तर इम्तियाज जलील हे कट्टरतावादी एमआयएम या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत. इम्तियाज जलील यांच्या शांतीगिरी […]

इम्तियाज जलील शांतीगिरी महाराजांची भेट घेणार, हिंदू मतांसाठी नवी खेळी?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:04 PM
Share

औरंगाबाद : एमआयएमचे विद्यमान आमदार आणि औरंगाबाद लोकसभेचे उमेदवार इम्तियाज जलील हे वेरुळ मठाचे मठाधिपती शांतीगिरी महाराज यांची भेट घेणार आहेत. 13 तारखेला ही भेट निश्चित झाल्याची माहिती आहे. शांतीगिरी महाराज हे औरंगाबाद जिल्ह्यातील हिंदू धर्मियांचं मोठं शक्ती स्थान आहेत. तर इम्तियाज जलील हे कट्टरतावादी एमआयएम या पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत.

इम्तियाज जलील यांच्या शांतीगिरी महाराजांच्या भेटीमुळे औरंगाबाद जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार का असा प्रश्न आहे. इम्तियाज जलील शांतीगिरी महाराजांना नुसते भेटणार की आशीर्वाद घेणार हा ही सवाल आहे. हिंदू मतांचं विभाजन टाळण्यासाठी शांतीगिरी महाराजांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. आता इम्तियाज जलील भेट घेणार असल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.

औरंगाबादमध्ये लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून इम्तियाज जलील, काँग्रेसकडून सुभाष झांबड आणि शिवसेना-भाजप युतीकडून चंद्रकांत खैरे हे उमेदवार आहेत. शांतीगिरी महाराजांनीही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. पण हिंदू मतांचं विभाजन होऊ नये यासाठी त्यांनी माघार घेतली. आपण कुणाला मदत करणार हे स्पष्ट नसलं तरी हिंदू मतांचं विभाजन न झाल्यास त्याचा थेट फायदा चंद्रकांत खैरे यांनाच आहे. पण हिंदू मतं मिळवण्यासाठी एमआयएमनेही हालचाल सुरु केल्याचं चित्र आहे.

कोण आहेत शांतीगिरी महाराज?

शांतीगिरी महाराज हे वेरुळ मठाचे मठाधिपती आहेत. वेरुळ घृष्णेश्वर या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक म्हणून ओळखले जाते, तर वेरुळ लेण्यांमुळे हे जगप्रसिद्ध आहे. याच वेरूळ गावात शांतीगिरी महाराजांचा भव्य मठ आहे. जनार्धन स्वामी उर्फ बाबा महाराज हे मठाचे पाहिले मठाधिपती होते. शांतीगिरी महाराज हे मूळचे नाशिक जिल्ह्यातल्या लाखलगाव इथले आहेत. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांची दृष्टी गेली होती. त्यामुळे ते वेरूळ येथील जनार्धन स्वामींच्या मठात आले. मठात त्यांची दृष्टी ठीक झाली त्यामुळे ते परत आपल्या गावी गेले, गावी गेल्यानंतर त्यांची पुन्हा दृष्टी गेली त्यामुळे महाराज पुन्हा मठात आले. मठात आल्यानंतर जनार्धन स्वामींनी शांतीगिरी महाराजांना मठातच राहायला सांगितलं, मठात राहून शांतीगिरी महाराजांनी संन्यस्त वृत्त स्वीकारलं, मठातच राहून महाराजांनी विज्ञान शाखेतून पदवीपर्यंतच शिक्षण घेतलं.

आज शांतीगिरी महाराज मठाधिपती असलेल्या मठाची करोडो रुपयांची संपत्ती आहे. महाराजांचे देशात 55 ठिकाणी मठ आहेत. तर 9 ठिकाणी गुरुकुल आहेत. आज घडीला मठाकडे शेकडो एकर जमीन आहे. नुसत्या वेरूळ इथल्या मठात महाराजांकडे तब्बल 200 एकर जमीन आहे. महाराजांना फिरण्यासाठी त्यांच्याकडे एसयूव्ही, टाटा सफारीसारख्या महागड्या गाड्या आहेत. तर शांतीगिरी महाराजांचे औरंगाबाद, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि जालना या पाच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भक्त आहेत.

शांतीगिरी महाराज यांनी आपल्या भक्त समुदायाच्या जोरावर 2009 साली लोकसभा निवडणूकही लढवली होती. या निवडणुकीत महाराजांनी तब्बल 1 लाख 48 हजार मतं घेतली होती. या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महाराज तब्बल दहा वर्षे निवडणुकीपासून लांब होते. सध्या शांतीगिरी महाराज राजकारणाचं शुद्धीकरण व्हावं यासाठी सातत्याने प्रयत्न करत असतात. यावेळी बाबांनी भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठीही चाचपणी केली होती. पण युती झाल्यानंतर महाराजांच्या अपेक्षांवर पाणी फिरलं.

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली