Chhagan Bhujbal : मोठी बातमी, छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज, मतभेदाच कारण काय?

Chhagan Bhujbal : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. काल देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक झाली. त्यात छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

Chhagan Bhujbal : मोठी बातमी, छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज, मतभेदाच कारण काय?
chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 11:04 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी आहे. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन छगन भुजबळ नाराज असल्याच समजतय. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणं छगन भुजबळ यांना फारस पटलेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे. प्रफुल पटेल यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसने अजून अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवाव असं राष्ट्रवादीमधल्या एका गटाच मत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. भविष्यातील बारामतीच राजकारण लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवाव असं पक्षात एक मतप्रवाह आहे.

पण छगन भुजबळ या मताशी फारसे अनुकूल नाहीयत. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यावर छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन भुजळ नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, पार्थ पवार यांची नाव चर्चेत होती. सुनेत्रा पवार यांच्या नावावर सहमती झाली असून आज त्यांचं नाव जाहीर होईल अशी माहिती आहे. देवगिरीवरच्या बैठकीत छगन भुजबळ काय म्हणाले?

छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. अलीकडच्या काही दिवसात लोकसभा निवडणूक निकालाच्या आधी आणि नंतर त्यांनी अनेक विषयांवर स्पष्टपणे आपली मत मांडली होती. लोकसभेसारख विधानसभेला व्हायला नको, म्हणून भाजपाकडे आताच 80 जागा मागून घ्या, असं छगन भुजबळ म्हणाले होते. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राज्यसभा उमेदवारीबाबत बैठक झाली. या बैठकीत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील, त्यावेळी छगन भुजबळ तिथे उपस्थित राहणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

Non Stop LIVE Update
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं.
जरांगेंकडून शिवीगाळ, लाड यांची पहिली प्रतिक्रिया, मी बोललो ते झोंबलं..
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली
... तर फडणवीसांसोबत लग्न कर...भाजप नेत्यावर टीका जरांगेंची जीभ घसरली.
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्..
सिंधुदुर्गात तुफान पावसानं झोडपलं, वेंगुर्ल्यातील पूल पाण्याखाली अन्...
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक
... तोपर्यंत दार उघडणार नाही, शेतकरी प्रश्नांसाठी नितीन देशमुख आक्रमक.
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा...
वडेट्टीवारांच्या बंगल्याला गळती; म्हणाले, लाडकी बहीण, भाऊ अन् मामा....
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही
ठाकरे गट 'इतक्या' जागा लढणार? 36 पैकी ‘या’ 25 मतदारसंघासाठी आग्रही.
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी
मुलाला आत्महत्येपूर्वी व्हिडीओ कॉल अन्...सी-लिंकवरून त्यानं घेतली उडी.
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर...
राऊतांचा थेट मुख्यमंत्र्यांना सवाल, शिंदेंच्या बहिणीचं, सुनेचं घर....
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात..
लोकलमधून उतरताच प्लॅटफॉर्मवरून प्रवाशी धावत सुटले... अंधेरी स्थानकात...
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज
राज्यात पुन्हा पावसाची बॅटिंग, आज कुठे कसा पडणार पाऊस? बघा IMDचा अंदाज.