मला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ : सुप्रिया सुळे

इन्कम टॅक्सचे काही आक्षेप आहेत त्याला आम्ही उत्तर देऊ", असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. ( Supriya Sule Uddhav Thackeray and Aditya Thackeray)

मला, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंना नोटीस, आम्ही उत्तर देऊ : सुप्रिया सुळे

पुणे : “राज्याच्या राजकारणात काय घडतंय यापेक्षा राज्यातील प्रश्न महत्वाचे आहेत. मला, शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आम्हा सगळ्यांना इन्कम टॅक्स नोटीस आल्या आहेत. बरोबर एका वर्षापूर्वी पवार साहेबांना अशी नोटिस आली होती, इन्कम टॅक्सचे काही आक्षेप आहेत त्याला आम्ही उत्तर देऊ”, असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं. त्या पुण्यात बोलत होत्या. (Income Tax Notice to Supriya Sule Uddhav and Aditya Thackeray)

खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषदेत लोकप्रतिनिधी आणि अधिकार्यांची बैठक घेऊन विविध विषयांचा आढावा घेतला. कोरोना काळात चांगलं काम करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा सत्कार यावेळी त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.

दुसऱ्याचा घास नको

मराठा समाजाला तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण मिळावं, तिथं स्थगिती देण्यात आलेली नाही. शिवाय दुसऱ्याच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं. दुसऱ्याच्या ताटातील घास घेऊ नये अशी आमच्या पक्षाची भूमिका आहे, असं सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं.

अभिनेत्रींच्या चौकशीतून विळखा सुटणार नाही

केवळ तीन हायप्रोफाईल अभिनेत्रींच्या चौकशीतून अमली पदार्थांचा विळखा सुटणार नाही. त्यासाठी प्रकरणाच्या मुळाशी जायला लागेल, तरच आपण समाज व्यसनमुक्त करु शकू, असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. ड्रग घेणाराच कोणी नसेल तर देणारे आपोआप संपुष्टात येतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कृषी कायद्याला विरोध

इतरांना विश्वासात न घेता कृषी विधेयक मंजूर करण्यात आलं. आमचा त्याला विरोध आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

(Income Tax Notice to Supriya Sule Uddhav and Aditya Thackeray)

संबंधित बातम्या 

Supriya Sule | शरद पवार नातवाला देतायत गाडी चालवण्याचे धडे, सुप्रिया सुळेंनी केला व्हिडीओ शेअर 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *