‘नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा!’ आता ही मागणी कुणी केली?

| Updated on: Oct 27, 2022 | 1:21 PM

नोटेवर कुणाचा फोटो हवा, यावरुन केजरीवालांनी केलेल्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हवा! आता ही मागणी कुणी केली?
नोटेवर छत्रपतींचा फोटो हवा अशी कुणाची मागणी?
Image Credit source: Twitter
Follow us on

सिंधुदुर्ग : भारतीय चलनात (Photo of Mahatma Gandhi on Indian currency) असलेल्या नोटेवर सध्या महात्मा गांधी यांचा फोटो आहे. पण आपचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी नोटेवर गणपती बाप्पा आणि देवी लक्ष्मीचा फोटो असावा, असं म्हटलं आणि राजकीय वातावरण ढवळून निघालं. आता तर यात भाजप आमदार नितेश राणे यांनीही उडी घेतली आहे. भारतीय नोटेवर छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो असावा, अशी मागणी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.

नितेश राणे यांनी नेमकं काय म्हटलं?

नितेश राणे यांनी नोटेबाबत ट्वीट करत मागणी केली आहे. ‘ये परफेक्ट है’ असं म्हणत नितेश राणे यांनी एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोसह छापण्यात आलेल्या एका नोटेचा फोटो आहे.

हे सुद्धा वाचा

नितेश राणे यांनी केलेल्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

पाहा नितेश राणे यांचं ट्वीट :

दरम्यान, याबाबत टीव्ही 9 मराठीने विचारणा केली असता नितेश राणे यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा फोटो भारतीय चलनावर दिवासा, अशी भारतीय म्हणून माझी वैयक्तिक मागणी आहे, असं त्यांनी म्हटलं.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भारतातच नाही, तर जगात आदर आहे. भारतीय चलनावर जर महाराजांचा फोटो असेल तर ती ऊर्जा देणारी बाब आहे. पंतप्रधान मोदींनी ही शब्दांपलीकडे जाऊन कृतीतून शिवरायांबद्दल आदर व्यक्त केला आहे. भारतीय नागरीक म्हणून मी माझी भावना व्यक्त केली आहे, असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.