‘लाल डायरी’चा मुद्दा गहलोत यांना भारी पडला ? काय आहेत कॉंग्रेसच्या पराभवाची 5 कारणे

राजस्थान विधानसभा निवडणूक निकालाच्या सुरुवातीचा कलापासून भाजपाची जोरदार मुसंडी राहीली आहे. आतापर्यंत आलेल्या कलानूसार कॉंग्रेसच्या हातातून सत्ता निसटत चालली आहे. दर पाच वर्षांनी राजस्थानातील सत्तापरिवर्तनाचा 'रिवाज' देखील कायम राहीला आहे. कॉंग्रेसच्या या पराभवामागची कारणे जाणून घ्या..

'लाल डायरी'चा मुद्दा गहलोत यांना भारी पडला ? काय आहेत कॉंग्रेसच्या पराभवाची 5 कारणे
ashok gehlot and vasundhara rajeImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 2:06 PM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : राजस्थानात आलपालटून सत्ता येत असते या न्यायानूसार आता पुन्हा भाजपाचे सत्तेत पदार्पण होताना दिसत आहे. गेल्या 25 वर्षांपासून येथील परंपरा बदललेली नाही. कॉंग्रेसनंतर आता भाजपाला मतदारांनी संधी दिल्याचे आकडे सांगत आहेत. मतमोजणीत भाजपा पुढे असून या ट्रेंड नूसार भाजपाला बहुमत मिळताना दिसत आहे. राजस्थानात यंदा 200 पैकी 199 जागांसाठी मतदान झाले. त्यानूसार बहुमतासाठी 100 जागांची गरज आहे. कॉंग्रेस या मॅजिक फिगरपासून खूपच दूर आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांची जादू फेल झाली आहे.

मुख्यमंत्री अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यात साल 2018 मध्ये कॉंग्रेसचे सरकार तयार होताच संघर्ष सुरु झाले. हा संघर्ष राष्ट्रीय पातळीवर गाजला. दोन्ही नेते खुलेआम मिडीयात तोंडसुख घेताना दिसले. कॉंग्रेस नेतृत्वाला दोघांमध्ये समेट घडविता आला नाही.गहलोत यांनी पायलट यांना बिनकामाचा, गद्दार असे संबोधले. निवडणूकीआधी देखील दोघांचे भांडण मिटविण्याचा प्रयत्न केला गेला. स्वत: राहुल गांधी दोन्ही नेत्यांसोबत एकत्र प्रचारात दिसले त्यांनी आम्ही सर्व एकत्र आहोत असा भासविण्याचा प्रयत्न केला.

पेपर लिक मुद्द्यावरून कॉंग्रेसला घेरले

पेपर लिकचा मुद्दा राजस्थान सरकारला चांगलाच महाग ठरला. राजस्थान नोकरी भरतीतील पेपर लिक मुद्द्यावरुन सचिन पायलट यांनी स्वत: सरकार विरोधात भूमिका घेत चौकशीची मागणी करीत घरचा आहेर दिला होता. गेली अनेक वर्षात अनेक परीक्षांचे पेपर फुटल्याने लाखो बेरोजगारांना फटका बसला आहे. भाजपाने हा निवडणूक मुद्दा बनविला कॉंग्रेसला चांगलेच जेरीस आणले.

लाल डायरी बनला मुद्दा

भाजपाने लाल डायरी हा निवडणूक मुद्दा बनविला. पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक सभात या कॉंग्रेसवर भ्रष्टाचाराचा आरोप करीत लाल डायरीचा मुद्दा प्रचारात वापरला. जुलै महिन्यात अशोक गहलोत सरकारचे बडतर्फ मंत्री राजेंद्र गुढा लाल डायरी घेऊन विधान सभेत पोहचले. त्यांनी गहलोत सरकारवर अनेक गंभीर आरोप केले. त्यामुळे भाजपाला मोठा मुद्दा सापडला आणि त्याचा पुरेपुर वापर भाजपाने या निवडणूकीत केला.

भाजपाचे हिंदुत्वकार्ड पुन्हा चालले

200 विधानसभेच्या जागा असलेल्या राजस्थानात भाजपाने पुन्हा हिंदुत्वकार्ड वापरत एका ही मुस्लीम उमेदवाराला तिकीट दिले नाही. साल 2018 च्या निवडणूकी भाजपाने टोंक येथून सचिन पायलट विरुद्ध युनूस खान यांना उतरविले होते. परंतू यंदा त्यांना तिकीट दिले नाही. एवढंच काय तीन मुस्लीम बहुल मतदारसंघात भाजपाने साधू संतांना निवडणूकीत उतरविले. जयपूरच्या हवा महल जागेसाठी संत बाल मुकुंद आचार्य यांना तिकीट दिले. तर अलवरच्या तिजारा जागेसाठी बाबा बालकनाथ यांना उतरविले. बालकनाथ स्वत:ला राजस्थानचे योगी म्हणून प्रोजेक्ट केले. एवढंच काय त्यांच्या प्रचाराला स्वत: योगी आदित्यनाथ मैदानात उतरले. पोखरण जागेसाठी महंत प्रतापपुरी यांना उभे केले.

कन्हैयालाल हत्याकांडाचा मुद्दा झाला

राजस्थान निवडणूका भाजपाने कन्हैयालाल हत्याकांड यांचा मुद्दा पेटला. या बहाण्याने भाजपाने कॉंग्रेसवर लांगुलचालनचा आरोप केला. जून 2022 मध्ये झालेल्या या हत्याकांडाच्या निमित्ताने येथे भाजपाने ध्रुवीकरणाचा प्रयत्न केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचारात कन्हैयालाल हत्याकांडाचा उल्लेख केला. कॉंग्रेस राजस्थानची परंपरा धोक्यात आणल्याचा आरोप त्यांनी केला. कॉंग्रेसच्या सुशासनात कॅमेऱ्यासमोर जे घडले त्याची कोणी कल्पनाही केली नव्हती, ही हत्या कॉंग्रेसवर मोठा डाग असल्याचा आरोप केला गेला. गृहमंत्री अमित शाह यांनी देखील कन्हैया हत्याकांडाचा उल्लेख अनेक वेळा केला.

परंपरा बदलली नाही

1998 पासून गेल्या 25 वर्षांत सत्ता परिवर्तनाची परंपरा राहीली आहे, इतकी वर्षे येथे दोनच मुख्यमंत्री राहीले आहेत. एक म्हणजे कॉंग्रेसचे अशोक गहलोत तर दुसरे म्हणजे भाजपाच्या वसुंधरा राजे याच आलटून पालटून सत्तेत येत राहील्या आहेत. आता ही देखील सत्ता परिवर्तनाचा ‘रिवाज’ कायम राहीला आहे.

Non Stop LIVE Update
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार
सेलिब्रिटी उमेदवार देणं ही चूक, अजित पवारांच्या आरोपावर कोल्हेंचा वार.
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर
भाजपाशी मनसेची युती होणार? काय म्हणाले बाळा नांदगावकर.
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी
'वडीलांबद्दल पातळी सांभाळून बोला, मी पण...,' काय म्हणाल्या अंकिता पाटी.
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर
मी माझा मालक आहे, आमचं अजून....,' काय म्हणाले प्रकाश आंबेडकर.
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे
गुवाहाटीत आमदाराने एअर होस्टेसचा विनयभंग केला, ॲड. असीम सराेदे.
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील
कल्याण लोकसभा निवडणूक लढविणार का? काय म्हणाले राजू पाटील.
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र
इंदापूरात फिरु न देण्याची धमकी, हर्षवर्धन पाटील यांचे फडणवीसांना पत्र.
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन
Video | 1936 पासूनच्या विण्टेज कार आणि बाईकचे प्रदर्शन.
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत
'प्रकाश आंबेडकरकरांवर काही मायावतींसारखा...,' काय म्हणाले संजय राऊत.
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.