Devendra Fadnavis : ‘टार्गेट’ असणे गैर नाही पण जनतेच्या मनातील वास्तवतेचे भान असणे महत्वाचे..! शिवसेनेच्या निर्धारावर फडणवीसांची बोचरी टीका

| Updated on: Sep 03, 2022 | 11:33 PM

मुंबई महापालिकेच्या अनुशंगाने आता वेगवेगळे दावे केले जात आहेत. दुसरीकडे मनसे-भाजप युतीची चर्चाही रंगली आहे. असे असतानाच शिवसेनेने या निवडणूकीत 150 जागांवर विजय खेचला जाणार. त्याच उद्देशाने शिवसेना निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते.

Devendra Fadnavis : टार्गेट असणे गैर नाही पण जनतेच्या मनातील वास्तवतेचे भान असणे महत्वाचे..! शिवसेनेच्या निर्धारावर फडणवीसांची बोचरी टीका
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : शुक्रवारी राज्याचे (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या बाप्पाचे दर्शन घेतले तर आज उपमुख्यमंत्री (Devendra Fadnavis) देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या घरी हजेरी लावली. या दरम्यान, त्यांनी शिवसेनेवर टीकास्त्र करण्याची संधी सोडली नाही. आगामी (Mumbai Municipal) मुंबई महापालिका निवडणूकीत शिवेसना ही 150 जागांवर नगरसेवक विजयी होणार असल्याचा दावा करीत आहे. यावर फडणवीस यांनी बोचरी टीका करीत यामध्ये गैर काही नाही पण जनतेच्या मनात काय आहे? याचे भान असणेही गरजेचे असल्याचे म्हणले आहे. यावरुन निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला नसला तरी राजकीय कलगीतुरा पाहवयास मिळत आहे.

किशोरी पेडणेकर यांच्यावर निशाणा

राजकीय नेत्यांनी आपली भूमिका बदलली असली तरी शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनते सेनेबरोबरच आहे. त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणूकांमध्ये शिवसेना 150 जागांवर विजय खेचणार हाच उद्देश घेऊन रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते. शिवाय ज्यांनी पक्षप्रमुख यांच्याशी गद्दारी केली त्यांच्याबद्दल जनतेच्या मनात तीव्र भावना आहेत. आगामी निवडणूकांमध्ये ते दिसूनच येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.

मनसेच्या भेटीगाठीवरही दिले स्पष्टीकरण

गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. त्यावरुन भाजप आणि मनसेची युती होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पण या चर्चा केवळ सोशल मिडियामधून होत आहेत. प्रत्यक्षात ह्या राजकीय भेटी नसल्याचे पुन्हा स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. त्यामुळे मनसे-भाजप युती होणार की नाही हे अद्याप तरी सांगता येणार नाही.

हे सुद्धा वाचा

बाप्पांच्या दर्शनासाठी फडणवीस राणेंच्या निवासस्थानी

सध्या गणेश उत्सवाच्या अनुशंगाने राजकीय नेतेमंडळी बाप्पांच्या दर्शनाचे निमित्त करुन एकमेकांच्या निवासस्थानी दाखल होत आहेत. शनिवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी दाखल झाले होते. यावेळी भाजप नेते प्रवीण दरेकर, आमदार नितेश राणे हे देखील उपस्थित होते.

जनतेच्या मनात काय हे महत्वाचे?

मुंबई महापालिकेच्या अनुशंगाने आता वेगवेगळे दावे केले जात आहेत. दुसरीकडे मनसे-भाजप युतीची चर्चाही रंगली आहे. असे असतानाच शिवसेनेने या निवडणूकीत 150 जागांवर विजय खेचला जाणार. त्याच उद्देशाने शिवसेना निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, हे सर्व होत असताना जनतेच्या मनात काय आहे? याचा विचार होणे गरजेचे असल्याचे फडणवीस म्हणाले आहेत.