Indapur : घर फिरले की, घराचे वासेही फिरतात..! सत्ता परिवर्तन होताच हर्षवर्धन पाटील जोमात, म्हणे कामांची तर चौकशी होणारच, निशाणा कुणावर..?

लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघात असणार आहेत. तर 6 सप्टेंबर रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या अनुशंगाने भाजप संवाद बैठकीचे आयोजन कऱण्यात आले होते. यावेळी मतदार संघाच्या अनुशंगाने काय मागणी करायची आणि संघटना वाढवायची कशी याबाबत चर्चा झाली.

Indapur : घर फिरले की, घराचे वासेही फिरतात..! सत्ता परिवर्तन होताच हर्षवर्धन पाटील जोमात, म्हणे कामांची तर चौकशी होणारच, निशाणा कुणावर..?
भाजप नेते हर्षवर्धन पाटील
Follow us
| Updated on: Sep 03, 2022 | 10:56 PM

इंदापूर : ‘घर फिरले की घराचे वासेही फिरतात’ अशी एक म्हण प्रचलित आहे. त्याचा प्रत्यय आता सत्तांतरानंतर काही मतदार संघात येऊ लागला आहे. गेल्या अडीच (Dattatray Bharane) वर्षात दत्तात्रय भरणे यांनी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद संभाळत इंदापूर मतदार संघातही अनेक विकास कामे केली. दरम्यानच्या काळात अलिप्त झालेले (Harshawardhan Patil) हर्षवर्धन पाटील सत्तांतरानंतर पुन्हा राजकारणात सक्रीय झाले आहेत. शिवाय कोणतेही पद नसताना त्यांनी केंद्रात आणि राज्यात असलेल्या (BJP Party) भाजप सरकारचा फायदा कसा करुन दिला जाईल हे जनतेला तर सांगितलेच पण भरणे मामांच्या काळात झालेल्या कामांची गुणवत्ताही तपासणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. नेमके हे कशाचे जोरावर ही शंका मात्र, सर्वसामान्याच्या मनात कायम राहिलेली आहे.

विकास कामांच्या गुणवत्तेची होणार चौकशी

एकतर महाविकास आघाडी सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयाला शिंदे सरकारने स्थगिती दिलेली आहे. असे असताना आता दुसरीकडे याच काळात झालेल्या कामांचा दर्जा तपासला जाणार असल्याचे हर्षवर्धन पाटील यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाहीतर यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना देखील इंदापूर तालुक्यात आणणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

भाजप संवाद बैठकीचे आयोजन

लोकसभा निवडणुकीच्या अनुशंगाने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण ह्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान बारामती लोकसभा मतदार संघात असणार आहेत. तर 6 सप्टेंबर रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील इंदापूरच्या दौऱ्यावर आहेत. त्या अनुशंगाने भाजप संवाद बैठकीचे आयोजन कऱण्यात आले होते. यावेळी मतदार संघाच्या अनुशंगाने काय मागणी करायची आणि संघटना वाढवायची कशी याबाबत चर्चा झाली. यावेळी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

पेयजल योजना भाजपच्या कार्यकाळतीलच

हर घर जल पेयजल योजनेबाबत बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, या योजनेत 55 ते 60% निधी हा केंद्र सरकारचा व 40 ते 45 टक्के निधी हा राज्य सरकारचा असतो. केंद्र आणि राज्य सरकार दोन्हीही भाजपचेच असल्याने या योजनांचा सर्व श्रेय हे भारतीय जनता पार्टीचेच आहे. यात राष्ट्रवादीचा काडीमात्र ही संबंध नाही, हे देखील त्यांनी पटवून दिले आहे.

‘मविआ’ च्या काळात ठेकेदार जोपासण्याचे काम

महाविकास आघाडी सरकारच्या काळात येथे केवळ ठेकेदारांना सांभाळण्याचे काम करण्यात आले होते. त्यामुळे कामाचा दर्जा हा खलावलेला आहे. बोगस बिले अदा करुन ठेकेदारांना अधिकचा लाभ घेऊन देण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना कोणताही नारळ फोडण्यासाठी नाही तर इंदापूर तालुक्यात झालेल्या रस्त्यांची गुणवत्ता तपासण्यासाठी एकदा तालुक्यात आणू असे आश्वासन हर्षवर्धन पाटील यांनी दिले आहे.

बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ
बाळासाहेब ठाकरेंच स्मरण अन् एकनाथ शिंदें घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ.
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
आतापासून राज्यात ‘देवेंद्र’पर्व, फडणवीसांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ.
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी
महायुतीच्या शपथविधी सोहळ्याला बॉलिवूड स्टारसह 'या' नेत्यांची हजेरी.
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या
'पेशन्स, जिद्द आणि चिकाटीने...,'पतीचे कौतूक करताना अमृता म्हणाल्या.
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे
'शपथ तर घ्यावीच लागेल कारण कनपट्टीवर..,' काय म्हणाले अंबादास दानवे.
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत
'साहेब जो निर्णय घेणार असतील त्यामागे आम्ही..., 'काय म्हणाले सामंत.
'शिंदे आमदारांच्या विनंतीला नकार देणार नाहीत', काय म्हणाले शिरसाट
'शिंदे आमदारांच्या विनंतीला नकार देणार नाहीत', काय म्हणाले शिरसाट.
'या' दिवशी इतर मंत्र्याचा शपथविधी, कुणाला किती मंत्रिपदं?
'या' दिवशी इतर मंत्र्याचा शपथविधी, कुणाला किती मंत्रिपदं?.
देवेंद्र फडणवीसांचा शपथविधीपूर्वी शरद पवारांना फोन, काय झालं बोलणं?
देवेंद्र फडणवीसांचा शपथविधीपूर्वी शरद पवारांना फोन, काय झालं बोलणं?.
'ती हिंमत शिंदेंमध्ये नाही, ते...', फडणवीस-दादांना राऊतांच्या शुभेच्छा
'ती हिंमत शिंदेंमध्ये नाही, ते...', फडणवीस-दादांना राऊतांच्या शुभेच्छा.