Congress: काँग्रेस आमदार नाराज नाहीत? काय सांगता, कैलास गोरंट्याल म्हणतात, अडीच वर्षे होऊन गेली….

| Updated on: Apr 01, 2022 | 4:32 PM

आपल्या विधानसभा मतदार संघात काम करण्यासाठी निधी मिळत नाही, अशी खंत जालन्याचे काँग्रेसचे (Congress MLA) आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी व्यक्त केल आहे. तसेच या बाबत आपण सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Congress: काँग्रेस आमदार नाराज नाहीत? काय सांगता, कैलास गोरंट्याल म्हणतात, अडीच वर्षे होऊन गेली....
आमदार कैलास गोरंट्याल यांनी टीव्ही 9 कडे व्यक्त केली खंत
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

जालना | आमदारकी मिळून अडीच वर्षे झाली तरीही आपल्या विधानसभा मतदार संघात काम करण्यासाठी निधी मिळत नाही, अशी खंत जालन्याचे काँग्रेसचे (Congress MLA) आमदार कैलास गोरंट्याल (Kailas Gorantyal) यांनी व्यक्त केल आहे. तसेच या बाबत आपण सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची लवकरच भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे 25 आमदार नाराज असल्याच्या चर्चा होत होत्या. ही चर्चा भाजप घडवून आणत असल्याचेही आरोप झाले. काँग्रेसच्या आमदारांकडून मात्र यास दुजोरा मिळत नव्हता. आता जालन्याच्या आमदारांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील खदखद उघड झाली आहे.  ही नाराजी व्यक्त करताना काँग्रेस पक्षाचे मंत्री काँग्रेसच्या आमदारांना निधी देत नाही आणि तिसऱ्याच माणसाला निधी दिला जातो आणि याचसाठी आपण सोनिया गांधी यांची 20 आमदारांसह भेट घेणार असल्याचे tv9 शी बोलताना सांगितले. तसेच संग्राम धोपटे यांना विधानसभेचे अध्यक्ष करावे याबाबत ही आपण सोनिया गांधी यांच्याशी बोलणार असल्याचे काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटयाल यांनी सांगितले. या आमदारांची 4 तारखेला भेट होण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे 20 आमदार नाराज

मागील काही दिवसांपासून राज्यातील काँग्रेसवर 25 आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र कैलास गोरंट्याल यांनी 20 आमदार नाराज असल्याचे जाहीर सांगितले आहे.  तसे पत्रक काँग्रेस अध्यक्षा सोनिया यांधी यांना आमदारांनी पाठवले आहे. तसेच तीन ते चार एप्रिल रोजी सोनिया गांधी यांनी आमदारांना भेटण्यासाठी वेळ देण्याची मागणी या पत्रकात करण्यात आली आहे. या आमदारांमध्ये संग्राम थोपटे, विकास ठाकरे, प्रणिती शिंदे, संजय जगताप, कुणाल पाटील, अमित झनक, पी. एन पाटील, कैलास गोरंट्या आदी आमदारांचा समावेश आहे.

डॉ. कराडांनी ऑफर दिलेले हेच कैलास गोरंट्याल

दरम्यान, आमदार कैलास गोरंट्याल काही दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमानंतर चर्चेत आले होते. भाजपच्या प्रत्येक कार्यक्रमांना ते आवर्जून हजेरी लावत असून ते भाजपात येणार की काय अशा वावड्या उठत होत्या. जालन्यातील रेल्वे विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ प्रसंगी कैलास गोरंट्याल यांनी आपल्या भाषणात रावसाहेब दानवे यांचं तोंडभरून कौतुक केलं होतं. तसेच केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी त्यांना भाजपात येण्याची खुली ऑफर दिली होती. त्यानंतर कैलास गोरंट्याल यांनीही विकासासाठी कमळ हातात घेण्याची तयारी दर्शवली होती.

इतर बातम्या-

New Financial Year | नव्या आर्थिक वर्षात सरकारला ‘करा’तून प्राप्ती ! तर नागरिकांना नियमांची धास्ती

Video Nagpur school | शाळेत विद्यार्थ्यांना गुढी उभारण्याचे धडे; उद्या सुटी असल्याने आजच उभारली गुढी