“देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, त्यांना दुसरं काही काम नाही”

| Updated on: Jan 01, 2020 | 4:54 PM

राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे (Jayant Patil criticizes Devendra Fadnavis ).

देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, त्यांना दुसरं काही काम नाही
Follow us on

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे (Jayant Patil criticizes Devendra Fadnavis ). देवेंद्र फडणवीस यांना सध्या दुसरं काहीही काम नाही. त्यातच त्यांच्या मनासारखं काही होत नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीस यांची मन:स्थिती समजू शकतो, असं मत जयंत पाटील यांनी व्यक्त केलं (Jayant Patil criticizes Devendra Fadnavis ). यावेळी त्यांनी विरोधीपक्षांनी कितीही प्रयत्न केले तरी महाविकासआघाडी सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वासही व्यक्त केला.

खाते वाटपासंदर्भात आघाडीच्या तिन्ही पक्षांची महत्त्वाची बैठक झाली. यानंतर जयंत पाटील यांनी खातेवाटपावरही भाष्य केलं. ते म्हणाले, “खातेवाटपाबाबत कुठलेही मतभेद नाहीत. आज किंवा उद्या खातेवाटप होईल. खातेवाटतात काहीही अडचण नाही. मुख्यमंत्री खातेवाटप लवकरच जाहीर करतील. कोणत्याही पक्षात मंत्रीमंडळ विस्ताराबाबत नाराजी नाही. अशी नाराजी असल्यास तिन्ही पक्ष ती नाराजी दूर करण्यास सक्षम आहेत.”

वस्तू आणि सेवा कराविषयी (जीएसटी) देखील बैठक झाल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली. जीएसटीचे उत्पन्न घटल्याने केंद्राकडून यायला हवा तो निधी येत नाही, असंही त्यांनी नमूद केलं. तसंच पीएमसी बँकेचं विलीनीकरण राज्य सहकारी बँकेत करता येणार नसल्याचंही स्पष्ट केलं.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, “मंत्रीमंडळ तयार होतं आणि त्यानंतर खातेवाटप होतं. मंत्रीमंडळ तयार झाल्यानंतर पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये खातेवाटप होतं. आमदार प्रणिती शिंदे या चांगल्या काम करत आहेत. त्यांनी मंत्रिमंडळात असावं असं आम्हाला वाटत होतं, पण ते होऊ शकलं नाही. त्यामुळे थोडीशी नाराजी आहे. खातेवाटप करताना काही बदल अपरिहार्य असतो. पण काँग्रेसमुळे खातेवाटप करण्यात उशीर झालेला नाही.”

या बैठकीनंतर अशोक चव्हाण म्हणाले, “खाते वाटप विषय आता मोठा विषय राहिलेला नाही. येणाऱ्या 2 दिवसांमध्ये यावर मार्ग निघेल. खाटेवाटपाविषयी कोणाचीही नाराजी नाही. सकाळी जीएसटी संदर्भात बैठक झाली. राज्यात महसूल कसा वाढेल या संदर्भात या बैठकीत चर्चा झाली.”

खातेवाटपाचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आहे. ते लवकरच हा निर्णय जाहीर करतील असं गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.