एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी जयंत पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट, जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनेचा शुभारंभ

| Updated on: Sep 02, 2021 | 6:22 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिलं आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव, तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आलं.

एकनाथ खडसेंच्या वाढदिवशी जयंत पाटलांचं आगळंवेगळं गिफ्ट, जळगाव जिल्ह्यातील सिंचन योजनेचा शुभारंभ
एकनाथ खडसे, जयंत पाटील
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्त जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी त्यांना एक आगळंवेगळं गिफ्ट दिलं आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या जळगाव जिल्ह्यातील वरणगांव, तळवेल परिसर सिंचन योजनेंतर्गत आज ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात आलं. यामुळे जळगाव जिल्ह्यातील बोधवड, मुक्ताईनगर, भुसावळ या तालुक्यातील 52 गावांना या योजनेचा लाभ होणार आहे. दरम्यान, या कार्यक्रमात व्हर्च्युअल माध्यमातून जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे सहभागी झाले होते. (Jayant Patil’s gift to Eknath Khadse, Launch of Varangaon, Talvel Irrigation Scheme)

वरणगांव, तळवेल परिसर सिंचन योजनेत, हातनूर धरणातून पावसाचे वाहून जाणारे पाणी लिफ्ट करून ओझरखेड धरणात पाठवले जाईल व या पाण्याचा वापर शेतीसाठी तसेच औष्णिक विद्युत केंद्रासाठी केला जाणार आहे. आज ओझरखेड धरणात पाणी सोडत योजनेचा पहिला टप्पा पूर्ण करण्यात आला आहे. यावेळी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजीमंत्री गुलाबराव देवकर, रोहिणीताई खडसे व प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

आर.आर. पाटील यांचं स्वप्न पूर्ण होणार: जयंत पाटील

संपूर्ण दुष्काळी भागाला पाणी देण्याचं काम महाविकास आघाडी सरकारच काम आहे. स्वर्गीय आर. आर .पाटील यांच्या काळात टेंभू आणि म्हैसाळ सिंचन योजनाचे पाणी दुष्काळी भागात आणण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यांच स्वप्न आज पूर्णत्व कडे जात आहे, असं जंयत पाटील म्हणाले. आज सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ मध्ये आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पाणी पूजन करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, कवठेमहांकाळ या तालुक्याला पाणी मिळण्यासाठी स्वर्गीय आर. आर.पाटील हे प्रयत्न करत होते. या दुष्काळी तालुक्यात आज पाणी पोहचले आहे. कवठेमहांकाळ भागातील 13 गावांना या पाण्याचा फायदा होणार आहे. तर उर्वरित काही भागात ही पाणी पाहोचेल. असेही पाटील म्हणाले.

टेंभू योजना नेमकी काय?

दुष्काळी भागाला पाणी मिळावं म्हणून पाण्याचा लढा 1993 पासून सुरु झाला होता. त्यानंतर 1996 मध्ये टेंभू उपसा जलसिंचन योजनेला मंजुरी मिळाली. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला, माळशिरस, मंगळवेढा, सांगली जिल्ह्यातील कवठेमहाकांळ, तासगाव, खानापूर, जत, मिरज, सातारा जिल्ह्यातील माण खटाव अशा 13 तालुक्यांना या योजनेतून पाणी मिळणार होते. तेव्हापासून या योजनेत अनेक गावांचा समावेश करण्यात आला पण अद्यापही टेंभू योजनेचे का पूर्णत्वास पोहोचलेलं नाही.

म्हैसाळ योजना

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचं 50 टक्क्यांपेक्षा अधिक काम पूर्ण झालेलं आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेद्वारे मिरज, कवठेमहाकांळ, तासगाव आणि जत तालुक्यातील गावां पाणी दिलं जातं. म्हैसाळ धराणातून पाणी उपसून दुष्काळी भागाला दिलं जातं.

इतर बातम्या :

विजय वडेट्टीवार जातीयवादी माणूस, मेटेंचा आरोप; आता वडेट्टीवारांचं जोरदार प्रत्युत्तर

पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची कायम उसाच्या फडात, पंकजा मुंडे म्हणतात…

Jayant Patil’s gift to Eknath Khadse, Launch of Varangaon, Talvel Irrigation Scheme