AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची कायम उसाच्या फडात, पंकजा मुंडे म्हणतात…

पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्यात.

पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची कायम उसाच्या फडात, पंकजा मुंडे म्हणतात...
PANKAJA MUNDE
| Edited By: | Updated on: Sep 02, 2021 | 5:52 PM
Share

मुंबई : राज्याच्या राजकारणात पंकजा मुंडे नेहमीच चर्चेत असतात. पंकजा मुंडे कुठे आहेत, काय करतात, याकडेच त्यांच्या कार्यकर्त्यांसह बऱ्याच जणांचं लक्ष असतं. सध्या पंकजा मुंडे या महाराष्ट्रात नाहीत, तर त्या बोस्टनला गेल्यात. पंकजा मुंडेंचा मुलगा शिक्षणासाठी बोस्टनला गेला असून, त्याला तिथे सोडण्यासाठीच पंकजा मुंडे गेल्यात. विशेष म्हणजे पंकजा मुंडेंनी फेसबुक पोस्ट करत याची माहिती दिलीय. पंकजा मुंडे आईच्या भूमिकेत दिसत असून, त्यांच्या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रियाही दिल्यात.

पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं…

पंकजा मुंडे यांच्या या पोस्टनंतर लक्ष्मण खेडकर नावाच्या एका व्यक्तीनंही एक फेसबुक पोस्ट केली. ते म्हणतात की, पंकजा मुंडेंनी त्यांचा मुलगा परदेशात बोस्टनला शिक्षणासाठी पाठवलाय, अशी बातमी सोशल मीडियावर वाचली, आनंद वाटला, त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाहीये, त्यासाठी एक जबाबदार आई म्हणून पंकजाताई तुमचं खूप खूप अभिनंदन आणि उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुमचा मुलगा आर्यमनला ही मनापासून शुभेच्छा देतो. पंकजाताई, आमचं फक्त एवढचं म्हणणं आहे की ऊसतोड मजुरांच्या नेत्या या नात्याने ऊसाच्या फडात, पाचाटात बालपण हरवलेल्या ऊसतोड मजुरांच्या लेकरांच्या शिक्षणासाठी काही विधायक करता येतयं का? तेही जरा पाहा,

केंद्रातली सत्ता तुमच्या हातात…

लोकांची मुंडके मोडून स्वत:ची घरं भरणाऱ्या बरबटलेल्या बाकीच्या बोलघेवड्या पुढाऱ्यांकडून आम्हाला अपेक्षा नाहीयेत, कसयं? राज्याची नसली तरी केंद्रातली सत्ता तुमच्या हातात आहे, तुमच्या लहान भगिनी प्रीतम मुंडे या खासदार आहेत, तुम्ही स्वतः बहुमतात सत्तेत असलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय सचिव आहात, करा काही तरी, नाही तर असं नको व्हायला की तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची कायम उसाच्या फडात, असं म्हणत खेडकर यांनी पंकजाताईंना साद घातली. त्यालाही पंकजा मुंडेंनी चोख उत्तर दिलंय.

शोषितांसाठी करणे म्हणजे जगणे आहे

पंकजा मुंडे म्हणतात, जरूर लक्ष्मण, मी ते करेन. आम्ही पहिल्यांदा अमेरिका इथे आलो तेही ऊस तोडणारी विमल (तेव्हा ते उसतोड कामगार होते) आणि तशाच लढण्यास तयार राहून यश मिळवणार्‍या सख्या घेऊन…. आता त्या योजनेचे चित्र बदलले असावे, मी प्रमुख नाही राहिले. प्रत्येकाची लढाई भिन्न असते कोणाची जगण्याची आणि कोणाची जगवण्याची. मी अनेक ऊसतोड मजुरांना त्यांच्या मुलाच्या शिक्षण घेण्यासाठी मदत करत होते, करते आणि करत राहणार आहे. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानमधून गरजूंच्या शिक्षणाला मदत, आपत्तीग्रस्त संसाराला मदत, रुग्णांच्या उपचारासाठी मदत, कोविड 19 मध्ये कोरोना केंद्र, पूरग्रस्त लोकांसाठी मदतफेरी, हे सर्व वंचित आणि शोषित यांच्यासाठी करणे म्हणजे जगणे आहे. कष्ट आणि मेरिट यांची सांगड घातल्याशिवाय काहीही होऊ शकत नाही, असं पंकजा मुंडेंनी सांगितलंय.

माझ्या आर्यमनच्या आईच्या रोलमध्ये मी 100 टक्के

गेल्या आठवड्यापासून पंकजा मुंडे या महाराष्ट्रात नाही. पंकजा मुंडे कुठे आहे? असा प्रश्न काही जणांना पडला होता. त्यावर सोशल मीडियावर बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावर फेसबुकद्वारे पोस्ट करत पंकजा मुंडेंनी माहिती दिली होती. पंकजा मुंडे पोस्टमध्ये म्हणाल्या होत्या की, हा आठवडा नक्कीच सर्व जण म्हणत असतील “पंकजा कुठे आहे?” मी अगदी समर्पित भूमिका बजावत आहे!! आणि भूमिका ती मी नेहमी आवडीने बजावत असते. माझ्या आर्यमनच्या आईच्या रोलमध्ये मी 100 टक्के आहे, किमान पुढचे 8 ते 10 दिवस. आर्यमन आता बॉस्टनमध्ये उच्च शिक्षण घेणार आहे. मी त्याच्या हॉस्टेलवर त्याला सोडण्यासाठी आले आहे, असं त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या या पोस्टवर लक्ष्मण खेडकर नावाच्या व्यक्तीनं पोस्ट करत त्यांना आवाहन केल्यानं त्यांनी त्यांना उत्तर दिलंय.

इतर बातम्या:

जे संभाजी छत्रपतींच्या पोटात तेच ओठावर आलंय का? मुख्यमंत्रिपदाची महत्वकांक्षा समजून घ्या 10 पॉईंट्समधून

“भाजपमधून बाहेर पडा, आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री करायला तयार आहोत”

pankaja munde reply on laxman khedkar facebook post on sugarcane workers

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.