KDMC Election 2022 : मनसे गड राखणार? कल्याण डोंबिवली प्रभाग 23मधली स्थिती काय? वाचा…

गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांची युती होती. मात्र, आता ही युती नाही. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे.

KDMC Election 2022 : मनसे गड राखणार? कल्याण डोंबिवली प्रभाग 23मधली स्थिती काय? वाचा...
कल्याण-डोंबिवली महापालिका, वॉर्ड 23
Image Credit source: tv9
| Updated on: Jul 29, 2022 | 9:04 PM

कल्याण डोंबिवली : निवडणुकांची रणधुमाळी आणि राजकीय पक्षांची (Political Parties) लगबग सध्या पाहायला मिळत आहे. 2022 या वर्षात महाराष्ट्रात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. त्यात राज्य सरकारबदल ही तर मोठी घडामोड होतीच. त्यासोबत महापालिकेच्या निवडणुकादेखील होणार आहेत. केडीएमसीत (KDMC election 2022) आतापर्यंत 122 जागा होत्या. 11 नोव्हेंबर 2020 रोजी महापालिकेच्या सदस्य मंडळाचा कार्यकाळ संपला आहे. 12 नोव्हेंबरपासून प्रशासकीय राजवट सुरू आहे. दरम्यान, केडीएमसीत गेल्या पाच वर्षात 122 जागांपैकी 52 जागा शिवसेना, 42 जागा भाजप, 4 जागा काँग्रेस, 2 जागा राष्ट्रवादी, 1 जागा एमआयएम, 9 जागा मनसेकडे तर 10 अपक्ष होते. यावेळी 44 प्रभागांमध्ये जागा 122वरून 133वर गेल्या आहेत. 11 नवीन प्रभाग पाहायला मिळत आहेत. तीन सदस्यीय प्रभागरचना यावेळी असणार आहे. मागील वेळी प्रभाग 23मध्ये मनसेने बाजी मारली होती. शिवसेनेसोबत (Shivsena) त्यांची चांगलीच टक्कर झालेली पाहायला मिळाली.

प्रभागातील व्याप्ती कशी?

नेतिवली कचोरे या प्रभाग क्रमांक 23मध्ये प्रामुख्याने कचोरे गाव, कचोरे टेकडी, नेतिवली टेकडी, टाटा पॉवर कॉलनी, कचोरे BSUP, मेट्रो मॉल जंक्शन, चक्कीनाका, सूचक नाका, तिसगाव आरोग्य केंद्र, कल्याण शिळ रोड, पत्रीपूल, रेल्वे समांतर रस्ता, पुना लिंक रोड, भीमाशंकर मंदीर आदी महत्त्वाचा परिसर येतो.

लोकसंख्येचे गणित

प्रभाग 23मधील एकूण लोकसंख्या 31,409 येवढी असून यात अनुसूचित जातीची लोकसंख्या 4429 एवढी आहे. तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या 423 इतकी आहे.

कोण मारणार बाजी?

गेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा या दोन पक्षांची युती होती. मात्र, आता ही युती नाही. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसची आघाडी होण्याची शक्यता आहे. तर नाही तर भाजपा आणि मनसेची युती होऊ शकते. मागील वेळी मनसेचा उमेदवार विजयी झाला होता. यावेळी चित्र वेगळे असणार की मनसे पुन्हा बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे.

विजयी उमेदवार (2015)

कस्तुरी देसाई – मनसे

प्रभाग 23 (A)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 23 (B)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

प्रभाग 23 (C)

पक्षउमेदवारविजयी उमेदवार
शिवसेना
भाजपा
काँग्रेस
राष्ट्रवादी
मनसे
इतर

आरक्षण कसे?

प्रभाग क्रमांक 23 अ हा अनुसूचित जातीच्या महिला उमेदवारासाठी राखीव असणार आहे. ब हा सर्वसाधारण महिला उमेदवारासाठी तर क हा विभाग अनारक्षित असणार आहे.