फडणवीसांचे खबरे ते IPS लॉबी, आव्हान कसं पेलणार, दिलीप वळसे पाटलांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार

| Updated on: Apr 06, 2021 | 3:39 PM

गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे पोलीस दलामध्ये लवकरच साफसफाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (know about maharashtra home minister's action plan)

फडणवीसांचे खबरे ते IPS लॉबी, आव्हान कसं पेलणार, दिलीप वळसे पाटलांचा अ‍ॅक्शन प्लॅन तयार
dilip walse patil
Follow us on

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे. त्यामुळे पोलीस दलामध्ये लवकरच साफसफाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पदभार स्वीकारताच पोलीस दलातील अधिकाऱ्यांच्या निष्ठा तपासण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आगामी काळात पोलीस दलात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (know about maharashtra home minister’s action plan)

दिलीप वळसे-पाटील यांनी आज दुपारी गृहमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पोलीस दलात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा असलेले अनेक अधिकारी आहेत, त्याबाबत वळसे-पाटील यांना विचारण्यात आलं. त्यावर, याबाबत सर्व माहिती घेण्यात येईल. कुणाच्या काय निष्ठा आहेत त्याची माहिती घेऊ. त्यानंतर जसं जसं आवश्यक असेल तसा निर्णय घेऊ, असं वळसे-पाटील म्हणाले.

राजकीय हस्तक्षेप नाही

पोलीस दलाचं सक्षमीकरण करण्यात येईल. स्वच्छ प्रशासन देण्यावर भर असेल. तसेच प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप करणार नाही. बदल्याच्या संदर्भात प्रत्येक विभागाची जी पद्धत ठरली आहे, वेगवेगळ्या स्तरावर जे अधिकार दिले आहेत. त्यानुसार काम करू असं ते म्हणाले.

आयपीएस लॉबीवर अंकूश ठेवणार?

आयपीएस लॉबी सरकारविरोधात काम करत आहे, ते विरोधी पक्षांना माहिती देत आहे, त्यावर काय करणार? असा सवाल करण्यात आला. फडणवीस हे मुख्यमंत्री होते. तसेच गृहखात्याचा पदभार त्यांच्याकडे पाच वर्षे होता. त्यामुळे गृहखात्यातील अधिकारी त्यांच्या संपर्कात असणं स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांना माहिती मिळते. त्यातून कसा मार्ग काढायचा आणि कामात सुधारणा कशी होणार याबाबत विचार केला जाणार आहे, असं ते म्हणाले.

पोलिसांना घर, भरतीही करणार

महिला आणि सामान्य नागरिकांना गृहविभागाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. त्यांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. यासाठी सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून काम करणार आहे. त्याकरिता आजीमाजी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांचा सल्ला घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. शक्ती कायदा, पोलीस भरती गतीमान करणं, पोलिसांना घरं देणं या सर्व गोष्टींवर लक्ष देणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

गुन्हे निवारण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

कोण काय आरोप करत आहे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. माझा पारदर्शक कारभार करण्यावर भर असेल, असं सांगतानाच दैनंदिन दिवसांमध्ये छोटे-मोठे गुन्हे होत असतात. हे गुन्हे निपटून काढण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था निर्माण करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं त्यांनी सांगितलं. (know about maharashtra home minister’s action plan)

 

संबंधित बातम्या:

सध्याचा काळ चॅलेंजिंग, प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

Pandharpur By-Election : मी राष्ट्रवादीत जातोय, अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश करतोय, भाजपच्या नेत्याची घोषणा

LIVE | पारदर्शक कारभार महाराष्ट्राला देण्याचा माझा प्रयत्न – दिलीप वळसे पाटील

(know about maharashtra home minister’s action plan)