Pandharpur By-Election : मी राष्ट्रवादीत जातोय, अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश करतोय, भाजपच्या नेत्याची घोषणा

कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत आहेत. 8 एप्रिल म्हणजे गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता नक्की झालंय.

Pandharpur By-Election : मी राष्ट्रवादीत जातोय, अजितदादांच्या उपस्थितीत प्रवेश करतोय, भाजपच्या नेत्याची घोषणा
भाजप नेते कल्याणराव काळे अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Follow us
| Updated on: Apr 06, 2021 | 2:23 PM

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. अशावेळी भाजपला एक मोठा धक्का बसलाय. कारण कल्याणराव काळे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरत आहेत. 8 एप्रिल म्हणजे गुरुवारी ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता नक्की झालंय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कल्याणराव काळे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. (BJP leader Kalyanrao Kale will join NCP on April 8)

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी आणि भाजपनेही ही निवडणूक प्रतिष्ठेची केलीय. राष्ट्रवादी काँग्रेसनं दिवंगत भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांना उमेदवारी दिलीय. तर भाजपकडून समाधान आवताडे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलंय. अशावेळी भाजप आणि राष्ट्रवादीच्या दिग्गजांकडून विजयासाठी जोरदार प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. अशावेळी कल्याणराव काळे यांचा भाजपला रामराम आणि राष्ट्रवादीतील प्रवेशामुळं राष्ट्रवादीला मोठा फायदा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू: कल्याणराव काळे

कल्याणराव काळे यांनी एका कार्यक्रमात केलेल्या वक्तव्याचीही चांगलीच चर्चा झाली होती. आपण यापुढे शरद पवार साहेब जे सांगतील त्या पद्धतीने काम करू, असे कल्याण काळे यांनी काही दिवसांपू्रर्वीच म्हटलं होतं. पवार साहेबांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुरांडे पेटले. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे कल्याणराव काळे यांनी सांगितले होते. कल्याणराव काळे यांनी 2014 मध्ये काँग्रेसकडून निवडणूक लढवून 65 हजार मते मिळवली होती. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कल्याणराव काळेंनी भाजपात प्रवेश केल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीला माढ्यासारख्या बालेकिल्ल्यातच खिंडार पडले होते.

कोण आहेत कल्याण काळे?

कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील मोठं नाव आहे.

विधानसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमध्ये गेले

भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष

सिताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापक

श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष

सोलापूर जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष

सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष

राज्य सहकारी साखर संघाचे माजी उपाध्यक्ष

माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात मोठा जनाधार

राजकारणाबरोबरच सामाजिक, शैक्षणिक, बँकिंग, आरोग्य क्षेत्रातही मोठं काम

संबंधित बातम्या :

पंढरपूर पोटनिवडणूक : समाधान आवताडे उमेदवारी अर्ज भरणार, भाजपच्या दिग्गजाचं शक्तिप्रदर्शन

Pandharpur By Poll | पंढरपूर पोटनिवडणूक बिनविरोध करायचं भाजपने ठरवलेलं, पण ‘तो’ उमेदवार असता तरच : निंबाळकर

BJP leader Kalyanrao Kale will join NCP on April 8

Non Stop LIVE Update
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....