Pandharpur By Poll | पंढरपूर पोटनिवडणूक बिनविरोध करायचं भाजपने ठरवलेलं, पण ‘तो’ उमेदवार असता तरच : निंबाळकर

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची धुरा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या खांद्यावर आहे. (Ranjeet Singh Naik Nimbalkar Pandharpur By Poll)

Pandharpur By Poll | पंढरपूर पोटनिवडणूक बिनविरोध करायचं भाजपने ठरवलेलं, पण 'तो' उमेदवार असता तरच : निंबाळकर
भाजप खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर

पंढरपूर : “आमदार भारत भालके (Bharat Bhalke) यांच्या निधनानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणूक (Pandharpur By Poll) भाजपला बिनविरोध करायची होती. त्याबद्दल प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांनाही कळवलं होतं, मात्र राष्ट्रवादीने भारत भालके यांच्या पत्नीला संधी दिली असती, तर भाजपची बिनविरोध निवडणूक करण्याची तयारी होती. परंतु राष्ट्रवादीला ही भावना कळली नसल्याचा आरोप भाजपचे माढा मतदारसंघातील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjeet Singh Naik Nimbalkar) यांनी केला आहे. (BJP Madha MP Ranjeet Singh Naik Nimbalkar claims BJP decided Pandharpur By Poll to be unopposed)

भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचाराची धुरा खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात ते तळ ठोकून आहेत

“अनुकंपाखाली जागा भरायला हे एसटी महामंडळ नाही”

“विरोधक पोटनिवडणुकीत मृत्यूचे भांडवल करुन अनुकंपाच्या नावाखाली जागा भरण्यासाठी मतं मागायला येतात, हे साफ चुकीचे आहे. आपल्याला लोकांना न्याय देता आला पाहिजे. लोकांचे प्रश्न विधानसभेत मांडता आले पाहिजेत. अनुकंपाखाली जागा भरायला हे काय एसटी महामंडळ नाही” अशा कडक शब्दात निंबाळकरांनी विरोधकांना सुनावले. तसेच माढ्याची जागा सोलापूरच्या जनतेने ज्या पद्धतीने शरद पवारांकडून काढून घेतली, तशी पंढरपूरची जागाही पुन्हा एकदा त्यांना देण्याची चूक जनता करणार नाही, अशी खात्री त्यांनी व्यक्त केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विठ्ठलभक्त”

“मतदारसंघासाठी केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांना देत आहे. 2014 च्या आधी पंढरपूर कसे होते, त्यानंतर 2014 पासून भाजपाच्या काळामध्ये रस्त्यांसह विविध विकास कामे झाली आहेत. पांडुरंग हा गरिबांचा देव आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विठ्ठलभक्त असल्याचा दावा नाईक-निंबाळकर यांनी केला.

“पंढरपूरला येणारे पाणी बारामतीला चोरुन नेले”

“दिवंगत आमदार भारत भालके आपले चांगले मित्र होते. 2014 पासून 35 गावांच्या पाणी प्रश्नासाठी आपलाही वाटा आहे. राष्ट्रवादी गावच्या पाणी योजनेमध्ये दोन टीएमसी पाणी देतो, असे सांगत आहेत. मात्र राज्य सरकारच्या बजेटमध्ये योजनेसाठी एक रुपयाची तरतूद केली असती तर भारत नानांना श्रद्धांजली ठरली असती” अशी टीका निंबाळकर यांनी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेता “बारामती येथील नेते पाणी चोर आहेत. पंढरपूरला येणारे पाणी बारामतीला चोरुन नेले आहे. त्यामुळे हे पाणी चोर पंढरपूरला पाणी देणार का” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Ranjeet Singh Naik Nimbalkar Pandharpur By Poll)

पंढरपुरात भगीरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे थेट लढत

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आलंय. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेलीय. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरले अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.

संबंधित बातम्या :

संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुप्त बैठक, पंढरपुरात चर्चेला उधाण

पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके?

(BJP Madha MP Ranjeet Singh Naik Nimbalkar claims BJP decided Pandharpur By Poll to be unopposed)