Pandharpur By-poll : संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुप्त बैठक, पंढरपुरात चर्चेला उधाण

निवडणूक प्रचार ऐन रंगात आला असताना आता मतदारसंघातील बड्या नेत्यांची एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.

Pandharpur By-poll : संजय शिंदे आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुप्त बैठक, पंढरपुरात चर्चेला उधाण
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या रणधुमाळीत आमदार संजय शिंदे आणि खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यात गुप्त बैठक झाल्याची चर्चा

पंढरपूर : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आता प्रचाराची रणधुमाळी पाहायला मिळतेय. प्रचारसभांबरोबरच आता बैठकांचं सत्रही सुरु झालं आहे. निवडणूक प्रचार ऐन रंगात आला असताना आता मतदारसंघातील बड्या नेत्यांची एक गुप्त बैठक झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. महत्वाची बाब म्हणजे हे दोन नेते कुण्या एका पक्षाचे नाहीत तर राष्ट्रवादी आणि भाजपचे असल्याचीही माहिती मिळतेय. त्यामुळे या गुप्त बैठकीत नेमकं काय शिजलं? असा प्रश्न आता विचारला जात आहे. (Secret meeting between NCP MLA Sanjay Shinde and BJP MP Ranjit Singh Naik Nimbalkar)

पंढरपूरची विधानसभा पोटनिवडणूक भाजप आणि राष्ट्रवादीनेही अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक आमदार संजयमामा शिंदे आणि माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची गुप्त बैठक झाल्याचं कळतंय. महत्वाची बाब म्हणजे ही बैठक कल्याण काळे यांच्या उपस्थितीत पार पडल्याचीही चर्चा सुरु आहे. आमदार संजय शिंदे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. त्यामुळे या गुप्त बैठकीत नेमकी कोणत्या विषयावर चर्चा झाली, या बैठकीत नेमकं काय शिजलं आणि त्याचे परिणाम काय होणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

पंढरपुरात भगीरथ भालके विरुद्ध समाधान आवताडे थेट लढत

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या विरुद्ध भाजपचे उमेदवार समाधान आवताडे असा थेट सामना होत आहे. राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या अकाली निधनामुळे ही पोटनिवडणूक लागली आहे. राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे पुत्र भरीरथ भालके यांनाच तिकीट देण्यात आलंय. तर परिचारक गटाने मंजुरी दिल्यानंतर भाजपकडून समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली गेलीय. हे दोन्ही उमेदवार तगडे असल्यामुळे ही पोटनिवडणूक अतिशय चुरशीची ठरले अशी शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.

कोण आहेत भगीरथ भालके?

पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे दिवंगत आमदार भारत नाना भालके यांचे सुपुत्र भारत भालकेंच्या निधनानंतर रिक्त जागेच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची धुरा दहा वर्षांपासून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळात कामाचा अनुभव

कोण आहेत समाधान आवताडे?

समाधान आवताडे यांनी 2014 मध्ये शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत आवताडे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात आवताडे हे दामाजी सहकारी कारखान्याचे चेअरमन आहेत मंगळवेढा पंढरपूर पोटनिवडणुकीतही अपक्ष उतरण्याची आवताडेंनी तयारी केली होती आमदार परिचारक गटाने पाठिंबा दिल्याने समाधान आवताडे यांना भाजपकडून उमेदवारी

17 एप्रिलला मतदान, 2 मे रोजी गुलाल!

>> अर्ज भरण्यास सुरुवात – 23 मार्च 2021 >> अर्ज भरण्याची अंतिम तारीख – 30 मार्च 2021 >> अर्जांची छाननी – 31 मार्च 2021 >> अर्ज मागे घेण्याची तारीख – 3 एप्रिल 2021 >> मतदान – 17 एप्रिल 2021 >> निवडणूक निकाल – 2 मे 2021

संबंधित बातम्या :

पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके?

पंढरपूर–मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक होणार तिरंगी; ‘आवताडें’मुळे येणार रंगत

Secret meeting between NCP MLA Sanjay Shinde and BJP MP Ranjit Singh Naik Nimbalkar

Published On - 6:21 pm, Mon, 5 April 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI