
कोल्हापूर : कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीचे (KMC Elections 2022 News) वारे वाहायला सुरुवात झालेली आहेच. आता अवघे काही दिवस निवडणुकीला उरलेत. अशातच पालिका निवडणुकांच्या (Maharashtra Municipality Elections) आरक्षणाची सोडत, वॉर्डचे नवी रचना या सगळ्यामुळे राजकीय समीकरणांवरही (Maharashtra Politics) परिणाम झाला, तर आश्चर्य वाटायला नको. आता तर तब्बल सात वर्षांनंतर कोल्हापूर महानगर पालिका निवडणूक होणार आहेत. कोरोना महामारीचा फटका आणि लॉकडाऊन यामुळे लांबलेल्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळाला असून आता रंगतदार लढत पालिका निवडणुकीत पाहायला मिळणात, हे तर स्पष्टच आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची ताकद असलेली पालिका म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जायचं. पण 2015च्या निवडणुकीत कोल्हापुरात भाजपनेही दमदार कामगिरी करुन दाखवली होती. आता महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या वादळात कोल्हापूर पालिका राखण्यात नेमकं यश कुणाला येतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच पालिकेसाठी युती-आघाडी यांचा खलबतं नेमकी काय भूमिका बजावतात, हेही पाहणं महत्त्वाचं आहे.
कोल्हापूर पालिकेचा प्रभाग क्रमांक एक हा तसा मुख्य शहरात मोडणाऱ्या प्रभागांपैकी एक आहे. या प्रभागातील मतदार नेमके कुणाच्या बाजूने यंदा कौल देतात ते पाहणं महत्त्वाचं आहे. नव्या आरक्षण सोडतीमुळे आणि प्रभाग रचनेतील बदलाचा फटका कोल्हापुरात प्रस्थापित नगरसेवकांना बसण्याचीही भीती आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पालिकेच्या प्रभाग क्रमांक एकचा सविस्तर आढावा घेणार आहोत.
प्रभाग क्रमांक एकमध्ये एकूण तीन वॉर्ड मोडतात. 2015 साली झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्य उमेदवारांनी प्रभाग क्रमांक एकमध्ये बाजी मारली होती. पण आता प्रभाक क्रमांक एकमधील कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित झाला आहे, त्यावर एक नजर टाकुयात..
कोल्हापूर महापालिका निवडणूक 2022, वॉर्ड क्रमांक 1 अ
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजपा | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| ताराराणी आघाडी | ||
| इतर |
कोल्हापूर महापालिका निवडणूक 2022, वॉर्ड क्रमांक 1 ब
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजपा | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| ताराराणी आघाडी | ||
| इतर |
कोल्हापूर महापालिका निवडणूक 2022, वॉर्ड क्रमांक 1 क
| पक्ष | उमेदवार | विजयी उमेदवार |
|---|---|---|
| शिवसेना | ||
| भाजपा | ||
| काँग्रेस | ||
| राष्ट्रवादी | ||
| ताराराणी आघाडी | ||
| इतर |
आंबेडकर नगर, संकपाळ नगर, शुगरमील, उलपे मळा, बडबडे मळा, पिंजार गल्ली, कसबा बावडा मुख्य रस्ता, कसबा बावडा फायर स्टेशन, मांत बसाहत, ठोंबरे गल्ली, बिंरजे पाणंद, कसबा बावडा पॅव्हेलियन, शाहू सेना चौक, कदमवाडी रस्ता, झूप प्रकल्प पाणंद रस्ता
2015 साली झालेल्या कोल्हापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीतील विजयी उमेदवार हे काँग्रेसचे होते. वॉर्ड क्रमांक 1 मधून सुभाष बुचडे, वॉर्ड क्रमांक दोन मधून श्रवण फडतरे, वॉर्ड क्रमांक तीनमधून संदीप नेजदार यांचा 2015 साली विजय झाला होता. आता 2022 साली होणाऱ्या पालिका निवडणुकीत हेच नगरसेवक पुन्हा शर्यतीत दिसणार का, याहीही उत्सुकता असणार आहे.
कोल्हापूर महानगर पालिकेमध्ये आधी 81 जागा होत्या आणि जागा 92 जागा आहेत. एकूण जागा 92 पैकी महिलांसाठी 46 राखीव आहेत. अनुसूचित जातीासाठी 12 जागा राखीव असून त्यापैकी देखील 6 महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तस ओपनसाठी 57 जागा असून त्यापैकी 29 जागा महिलांसाठी राखीव आहेत. दरम्यान, महत्त्वाचं म्हणजे ओबीसींसाठी 22 जागा राखीव असून पैकी 11 जागा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.