AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोल्हापुरात ‘बंटी विरुद्ध मुन्ना’ वाद उफाळला, राजाराम साखर कारखान्याच्या सभेतच राडा

राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक यांचे समर्थक भिडल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

कोल्हापुरात 'बंटी विरुद्ध मुन्ना' वाद उफाळला, राजाराम साखर कारखान्याच्या सभेतच राडा
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Sep 11, 2019 | 1:38 PM
Share

कोल्हापूर : कोल्हापुरात महाडिक आणि पाटील गटातील वाद (Kolhapur Mahadik Vs Patil) पुन्हा एकदा उफाळून आला आहे. राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत महादेवराव महाडिक (Mahadeo Mahadik) आणि सतेज पाटील (Satej Patil) यांचे गट आमनेसामने आले. भरसभेतच दोन गट भिडल्यामुळे (Kolhapur Mahadik Vs Patil) मोठा राडा झाला.

कोल्हापुरातील राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या भाजपवासी झालेले धनंजय उर्फ मुन्ना महाडिक आणि काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार आणि माजी गृहराज्यमंत्री सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यातील वाद नवीन नाही. राजाराम साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बंटी पाटील आणि मुन्ना महाडिक यांचे समर्थक भिडल्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.

सर्वसाधारण सभा सुरु असतानाच दोन्ही बाजूकडून आपापल्या नेत्यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करण्यात आली. तर पाटील गटाकडून भर सभेत पत्रकं भिरकावण्यात आली.

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून यंदा ऋतुराज पाटील हे रिंगणात उतरणार असल्याची घोषणा सतेज पाटील यांनी कार्यकर्ता मेळाव्यात केली होती. महत्त्वाचं म्हणजे सतेज पाटील यांच्या या मेळाव्याला शिवसेना खासदार संजय मंडलिक (Shiv Sena MP Sanjay Mandlik) हे सुद्धा उपस्थित होते. आमदार सतेज पाटील यांच्या निर्णयास माझा पाठिंबा आहे, असं शिवसेना खासदार संजय मंडलिक यांनी यावेळी सांगितलं.

सतेज पाटलांची घोषणा, पुतण्या ऋतुराजला उमेदवारी, काँग्रेसच्या मेळाव्यात शिवसेना खासदार मंचावर

2014 च्या विधानसभा निवडणुकीत सतेज पाटील हे कोल्हापूर दक्षिणमधून लढले होते. मात्र त्यावेळी त्यांचा भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांनी पराभव केला होता. त्यामुळे या पराभवाचा वचपा म्हणून सतेज पाटील यांनी अमल महाडिक यांचे चुलत बंधू धनंजय महाडिक यांच्याविरोधात लोकसभेला भूमिका घेतली. राष्ट्रवादीकडून लढलेल्या धनंजय महाडिक यांचा पराभव झाला. नुकतंच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात हाय-टेन्शन मतदारसंघ म्हणून कोल्हापूर दक्षिण (Kolhapur South) या मतदार संघाकडे पाहिलं जातं. कारण याठिकाणी पारंपरिक शत्रू असलेले महाडिक गट आणि सतेज पाटील (Satej Patil) गट समोरासमोर असतील . 2014 मधील विधानसभा निवडणुकीत भाजपने ऐनवेळी उमेदवारी दिलेले अमल महाडिक यांनी तत्कालिन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा पराभव करत मोठा धक्का दिला होता.

भाजपमध्ये प्रवेश करुन अवघ्या काही दिवसात अमल महाडिक (Amal Mahadik) यांनी चमत्कार करुन दाखवला होता. त्यातूनच महाडिक आणि पाटील गटाचं राजकीय शत्रूत्व शिगेला पोहोचलं. धनंजय महाडिक यांना 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मदत करुनदेखील विधानसभेला महाडिक यांनी धोका दिल्याचा आरोप सतेज पाटील यांचा आहे. त्याचाच हिशेब सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत आमचं ठरलंय म्हणत चुकता केला. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक यांचा पराभव झाला.

आता पुन्हा दक्षिणमधून सतेज पाटील यांनी दंड धोपटले आहेत. त्यामुळं कोल्हापूर दक्षिणमध्ये सतेज पाटील विरुद्ध अमल महाडिक अशी लढत होऊ शकते. यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे. 2014 मध्ये आमदार अमल महाडिक यांना 1,05,489 मतं मिळाली होती. तर पराभूत सतेज पाटील यांना 96,961 मतं मिळाली होती.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...